Home शैक्षणिक नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात एचएससी व एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात एचएससी व एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

246

 

ब्रम्हपुरी : – स्थानिक नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथे एचएससी (बारावी) व एसएससी (दहावी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव आदरणीय श्री. अशोक भैय्या साहेब, मुख्याध्यापक आदरणीय श्री. के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री. एन. डब्ल्यू. नाकाडे सर, तसेच पर्यवेक्षक आदरणीय प्रा. पी. आर. जिभकाटे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. एचएससी (बारावी) परीक्षेत. मधुर खुशाल तोंडरे – प्रथम क्रमांक,जसवंत वीपासू बुद्धे – द्वितीय क्रमांक,तुषार विनायक मिसार – तृतीय क्रमांक
एसएससी (दहावी) परीक्षेत
हर्षल होमराज पगाडे – प्रथम क्रमांक* (94.20%),साहिल राऊत व हर्षल विखार – द्वितीय क्रमांक (90%),कृणाल सूर्यवंशी – तृतीय क्रमांक (89.80%) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. नाईक सर यांनी विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण निकालाची माहिती दिली व यशामागील शालेय प्रयत्नांचे विश्लेषण मांडले. सचिव अशोक भैय्या साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे व शिक्षकांच्या योगदानाचे मन:पूर्वक कौतुक केले , विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यांचे सुंदर फलित असून अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन घडते असेही ते म्हणाले . शेवटी सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय देशमुख मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन आदरणीय उरकुडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here