Home महाराष्ट्र पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून...

पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध-मृत पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण आदरांजली

183

 

 

चोपडा – चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जन शिक्षण संस्थानच्या प्रांगणात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भैय्यासाो. अँड. संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याने जग हादरले असून सदरील घटना अत्यंत क्रूर व निंदनीय आहे. सदरील घटनेचा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करून तसेच सदरील घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.सुरेश सिताराम पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे, चोसाका व्हाईस चेअरमन श्री.गोपाल धनगर, सूतगिरणी संचालक के. डी. चौधरी, राजेंद्र पाटील, सुनील बागुले, अँड. एस. डी. पाटील, वजाहत अली काझी, शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट बाळकृष्ण शंकरराव सोनवणे, चोसाका संचालक शिवाजी अभिमन देसले, शेख आरिफ शेख सिद्दिकी, युवराज शालिग्राम पाटील, मोहन देवराम पाटील, रमाकांत सोनवणे, यशवंत खैरनार, महबूबखाँ पठाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here