Home महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा पिंपरी येथील शिक्षिका चैताली सत्यजित कुलकर्णी यांनी साजरा केला...

जिल्हा परिषद शाळा पिंपरी येथील शिक्षिका चैताली सत्यजित कुलकर्णी यांनी साजरा केला आपल्या मुलीचा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने.

386

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

म्हसवड /सातारा : पिंपरी ता माण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. या शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ चैताली सत्यजित कुलकर्णी यांची कन्या रेवा हिचा दुसरा वाढदिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करून साजरा केला .आपल्या कन्येच्या जन्मदिनानिमित्ताने शेकडो विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप गावच्या विद्यमान उपसरपंच सौ लक्ष्मी ताई बुधावले,माजी उपसरपंच श्री गुलाब राजगे,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सोनाजी व नेताजी राजगे,डॉ दिलीप राजगे,सौ शबाना व सौ अफसाना मुलाणी, सौ सारिका शिलवंत व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सौ चैताली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्राम पंचायत क्लार्क शहाजी अवघडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
लेखन साहित्य पाहून बालचमू आनंदून गेले
शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले व सर्व उपस्थितांनी असे उपक्रम राबवावेत व शाळेला भरघोस मदत करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमात शाळेची माजी विद्यार्थिनी श्रावणी विजय अहिवळे हिची डॉ बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थिनी म्हणून जिल्हा परिषद सातारा च्या वतीने निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
श्री सुरजकुमार निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
याप्रसंगी शाळेचे सर्व सहकारी व विद्यार्थी ,पालक सौ धनश्री सुमित कुलकर्णी व इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here