Home महाराष्ट्र आव्हान मोठे पण योगदान आवश्यक-दीपक देशपांडे

आव्हान मोठे पण योगदान आवश्यक-दीपक देशपांडे

249

▪️मूल येथे जागतिक ग्राहक हक्क दिन समारंभ

✒️मूल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मूल(दि.16मार्च):-ग्राहक जागृतीचे कार्य करीत असतांना मार्गात असंख्य अडचणी, प्रश्न आणि विरोध हे होतच राहणार आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी अथक प्रयत्न आणि संयम जर आपण कायम टिकवू शकलो तर आपल्यापुढे कितीही मोठे संकट ,व आव्हान आले तरी सगळ्यांच्या समर्पणाने आणि टिकवल्या जाणाऱ्या संयमाने आपण यशाची पायरी चढत राहू शकतो. आपल्याला माणसं जोडायची आहेत आणि माणूस पण जपायचं आहे केवळ डोकी जोडायची नाहीत की गर्दी वाढवायची नाही , त्यामुळे आपली संख्या किती आहे यापेक्षा आपले कार्य कसे आहे यावरून आपली ओळख झाली पाहिजे आणि केवळ *मी* नाही तर आपल्या सोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे असा आपला प्रयत्न असला पाहिजे ,असे प्रतिपादन जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च निमित्ताने आयोजित ग्राहक दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना दीपक देशपांडे यांनी केले.

जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने मूल तालुक्यातील ग्राहक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , जि.प.उच्च माध्यमिक शाळा चितेगावचे मुख्याध्यापक डोमाजी बट्टे यांच्या मूल येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ,डोमाजी बट्टे आणि विरेंद्र येत्ते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते,तर दीपक देशपांडे हे अध्यक्षस्थानी होते.

आपल्या संबोधनात डोमाजी बट्टे यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे वर्णन करताना समाजात जर कुणी चांगले कार्य करीत असेल तर चिखलामधील खेकड्याप्रमाणे कुणी दुसऱ्याला पुढे जाऊ न देता त्यांचे पाय धरुन उलटे ओढण्याचा प्रयत्न केला जातो तसेच सामाजिक कार्य करताना कुणाला प्रोत्साहन देऊन पुढे नेणे तर सोडाच पण पुढे जाणाऱ्यांचे पाय धरुन मागे ओढण्याचा प्रकारचं बघायला मिळत असल्याचे चित्र आहे,अशा विपरीत परिस्थितीत जागृत ग्राहक राजा आणि दीपक देशपांडे यांची संपुर्ण चमू पूर्ण ताकदीने समाजमन बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि प्रेरणादायी बाब असल्याने आज मी या संघटनेच्या सोबत कार्य करण्याचा निर्णय घेतला असून एका सामाजिक कार्यात आपलाही हातभार लागावा व त्यासाठी करावे लागेल ते सर्व कार्य मी स्वेच्छेने करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, आपण ज्यांचा आदर्श पुढे ठेवून हे कार्य पुढे ठेवून हा कार्याची वाटचाल सुरू केली आहे ती व्यक्ती एक महान असून स्वामी विवेकानंद यांचे कार्य डोळ्यासमोर आले तरी त्यांच्या मनातील तळमळ आणि देशाप्रती असणारा जिव्हाळा सतत स्फुर्तीदायी असणार आहे , समाजात होणारी ग्राहकांची फसवणूक आणि लुटारुपणावर अंकुश लावण्यासाठी आपण या संघटनेच्या माध्यमातून शक्य ते प्रयत्न करुन समाजात जागृती करुन फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक जागृती अभियान ज्या तळमळीने राबवित आहात त्याची मी बऱ्याच दिवसांपासून पाहणी आणि शहानिशा करीतअसून एवढं निखळ आणि निस्वार्थी कार्य बघून मी फार प्रभावीत झालो असून त्यामुळेच आपल्या या माणुसपण जपणाऱ्या आणि माणसासाठी लढणाऱ्या खऱ्या लढवय्यांना साथ देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे,ती संधी दिल्याबद्दल आम्ही कुटूंबीय समस्त जागृत ग्राहक राजा परिवाराचे ऋणी असणार आहोत.

विरेंद्र येत्ते प्राथ. शिक्षक यांनी ग्राहक जागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या या अभिनव कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आणि माझ्या परीने शक्य होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम बांगरे संघटक, यांनी केले ,याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कार्याची दखल पुणे येथील संघटनेच्या अधिवेशनात घेतली गेली आणि ही बाब आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आणि आपण करीत असलेल्या कार्याची थोरवी किती मोठी आहे याची खात्री पटली असे स्पष्ट केले.

अशोक मैदमवार उपाध्यक्ष, यांनी एकुणच आजवरच्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि आम्ही संख्येने किती आहोत यापेक्षा कर्माने कसे आहोत ह्याकडे बघणे गरजेचे असून समाजातील फसवणूक टाळण्यासाठी व ग्राहक संरक्षणासाठी उभारलेल्या या सामाजिक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन आणि फसवणूक टाळायची असेल तर जागरुकता बाळगणे आवश्यक असल्याचे आणि एक मजबूत ग्राहक संघटना निर्माण करण्याची आवश्यकता याबाबत आपले मत नोंदवले.

एक व्यावसायिकही ग्राहक असतो आणि त्याला ग्राहक म्हणून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते ह्याची केवळ कल्पनाच नाही तर त्या अडचणींवर मात करून एक उत्तम व्यावसायिक बनण्याची संधी जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या संपर्कात आल्यानंतर मला मिळाली आणि आता मी माझा व्यवसाय चालवीत असताना सामाजिक भान जपण्याचा व ग्राहकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करीत प्रमोद मशाखेत्री यांनी जनतेच्या सहभागाची अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

डॉ आनंदराव कुळे, यांनी आजच्या काळात राजकारण आणि समाजकारण यांचे दाखले देत एक प्रवाहासोबत जाण्याचा प्रकार म्हणजे राजकारण असल्याचे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणे म्हणजे समाजकारण असल्याचे स्पष्ट करीत जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून कार्य करणे हे किचकट समाजकारण असून कितीतरी संकटांचा ,विरोधाचा ,नाराजीचा सूर ऐकून कार्यरत असण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट करीत आज जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरु केलेले कार्य हे वाहत्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुरू असून कधी अधिकारी तर कधी व्यावसायिक तर कधी आपलेच आपण परस्पर विरोधात उभे ठाकत असतो मात्र याही परिस्थितीत संवाद आणि समन्वयातून साध्य हे धोरण अवलंबत कुठे वाद नाही कुठं विवाद नाही मात्र प्रश्नांची उकल करण्याचा व योग्य कारवाई करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शैली यामुळे ग्राहकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी उठाव आणि आंदोलन नाही तर पर्याय पुढे ठेवून योग्य निर्णय घेतला जाऊ शकतो हे दाखवून देणारे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आणि स्वागतार्ह आहे, म्हणून आम्ही या कार्यात तनमन धनाने समर्पित होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अंमल सुरू केला. संवाद चर्चेतून अनेक प्रश्नांची सोडवणूक करता येऊ शकते हा आशावाद होता तो प्रत्यक्ष अनुभवला आणि म्हणूनच जनतेने आपल्या हक्कासाठी पुढे येण्याची व जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता नमुद केली.

ग्राहक जागृती करणे म्हणजे एक ईश्वरीय कार्य असल्याचे व आजपर्यंत समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी असे कार्य करण्याची संधी मिळाली नव्हती मात्र निवृत्तीनंतर ही संधी मिळाली आहे तर वेळ आणि रिकामेपणाची भावना गळून पडली असून एक नवचैतन्य निर्माण झाले असून माणुस आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थीच असतो याची प्रचिती आली आणि अजूनही आपण किती गोष्टिंपासून अनभिज्ञ आहोत याची ओळख होत आहे , दररोज नवीन काही शिकायला मिळतं आहे आणि समाजाची फसवणूक किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची तोंडओळख होत आहे त्यामुळे ग्राहक या शब्दाची व्याप्ती आणि त्या शब्दासोबत आलेल्या समस्या जवळून समजून घेता येत आहे , दररोज नवीन काही शिकायला मिळतं आहे तर त्यावर उपाय कसा व कुठे करता येईल याचाही परिपाठ होत आहे म्हणूनच नवतरुणांनी आणि ज्यांचे जवळ रिकामा वेळ आहे पण वेळ जात नाही म्हणणाऱ्यांनी आपल्या कुटुंबाला आणि स्वतः ला फसवणूकीपासून दूर ठेवण्यासाठी जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून कार्य प्रवृत्त व्हावे अशी अपेक्षा रमेश डांगरे सचिव यांनी व्यक्त केली.

स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अतिथींचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश डांगरे सचिव यांनी केले , याप्रसंगी सौ.अनिता व डोमाजी बट्टे यांचा सपत्नीक सत्कार जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे व सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here