Home महाराष्ट्र जिवंत देव नकोत,दगडाचे देव पाहिजे

जिवंत देव नकोत,दगडाचे देव पाहिजे

258

हिंदूंचे सर्वच देव देवता मृत झालेले आहेत. आज जिवंत कोणीही देव किंवा देवता नाही. जरी असला तरीही हिंदू त्याला मानत नाहीत.तो मेल्यावरच त्याला कोणीतरी देव असल्याचे म्हटले तर इतर हिंदू देव मानतात.

    राम जिवंत असतांना हिंदू त्यांना देव मानतच नव्हते. जर मानले असते तर वनवासात पाठवले नसते. तेथेही जर रामाला देव मानले असते तर रावण आणि मारीच ने सीतेचे अपहरण केले नसते. अपहरण झाल्यानंतर सुद्धा रामाने अनेक राजांना मदतीची विनंती केली होती. पण बोरं खाऊ घालून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.कारण राम जिवंत असेपर्यंत देव मानले जात नव्हते. मेल्यानंतर मात्र देव काय ईश्वर, प्रभू वाटायला लागले.

     कृष्ण हयात असताना त्यांना हिंदू लोक देव मानत नव्हते.जर त्यांना देव मानले असते तर कंस, धृतराष्ट्र, भिष्म, कौरव यांनी त्यांची पुजा केली असती. युद्ध करू नका, असे ऐकून घेतले असते. पण नाही. असे घडलेच नाही. कारण कृष्ण देव आहेत असे मानायला तयार झालेच नाहीत. मेल्यानंतर मात्र देव काय ईश्वर,प्रभू वाटायला लागले.

    म्हणून राम कृष्ण किंवा महादेव वगैरे देव देवतांना हिंदू लोक मुर्ती स्वरूपातच मानतात. हिंदू सायकॉलॉजी आहे. मृत देवानांच मानले जाते. जिवंत देवांना मानतच नाहीत.म्हणून ही मृत संस्कृती आहे. मेलले देव, मेलेली माणसे या संस्कृतीत पुज्य असतात. म्हणजे मेल्यानंतरच पुज्य बनतात.बनवले जातात. म्हणून आमचे देव दगडाचे आहेत.

       भारतात गांधीजी सारखा देव माणूस सुद्धा जिवंतपणी हिंदू लोकांना खटकला. मरत नाही म्हणून गोळ्या घालून मारला. कारण हिंदू संस्कृतीत जिवंत देव नकोच आहे. देव माणूस सुद्धा नकोच. जिवंतपणी तो त्रासदायक असतो.कारण तो न्याय देतो.चोरी, भ्रष्टाचार, बलात्कार करू देत नाही. खोटे बोलू देत नाही.म्हणून त्याला ठार करावे लागते.त्या नंतर ही हिंदू लोकांनी दाभोलकर,या देवासारख्या माणसाला मारून टाकले. देव ही नको आणि देव माणूस ही नको. कारण तो देव किंवा देव माणूस जिवंतपणी ऐकून घेत नाही. पण मेल्यानंतर मात्र तो हिंदूचे बाहुले बनतो. पाहिजे तेंव्हा मुर्ती बनवा. पाहिजे तेंव्हा तोडा फोडा.किंवा पाण्यात बुडवा.

     देव आमचा हुकमाचा ताबेदार असला पाहिजे. तो आम्ही बांधलेल्या मंदिरात कैद असला पाहिजे.म्हणजे देवांच्या नावाने काहीही खपवता येते.हा देवांचा आदेश आहे, असे सांगता येते.

    आज मला वाटते कि हिंदू लोकांचे देव माणसांच्या कैदेत आहेत. कदाचित हे मानव नसून राक्षस असू शकतात.

 

     काशीला जातांना एक माणूस भेटला.

म्हटले,

“काहो !चला अयोध्येला.आपण रामाला भेटून येऊ.”

“अरे मित्रा,माझे नांव राम आहे.

“अहो देवा! आम्ही तिकडे येत आहोत तुम्हाला भेटायला आणि तुम्ही इकडे कुठे?”

“मी माझ्या भक्तांना भेटायला जातो.”

“अहो पण!तिकडे खूप माणसे गेली आहेत.तुम्हाला पहायला.आम्ही पण जात आहोत.”

“तुम्ही जा अयोध्येला.त्यांना जाऊ द्या अयोध्येला. तुम्हाला दगडाच्या मुर्ती मधील रामाला भेटायचे आहे. पण माझा भक्त साक्षात मला भेटण्याचा आग्रह करतो. मला माझ्या भक्ताला भेटणे आवश्यक आहे.”

“असा कोण माणूस आहे?काय विशेष त्यात?”

“ज्या माणसात थोढे जरी देवपण असले तरीही ते माझे स्वरूप आहे. त्यात माझा अंश आहे. माझ्यात तो आहे. म्हणून तो माझा भक्त आहे. मला माझे आस्तित्व टिकवणे, वाढवणे आवश्यक आहे.ती माझी प्रवृत्ती बनली आहे‌. प्रकृतीच्या संवर्धनासाठी.”

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here