


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याच्याविरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फलटणमधील बहुजन समाजाने फलटणचे दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समस्त बहुजन समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वारगेट एसटी बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये काळिमा फासणारी घटना घडली. दत्तात्रय गाडेने तरुणीला फसवून जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार केला. या घटनेचा फलटणमधील समस्त बहुजन समाज जाहीर निषेध करतो. अशा विकृत, समाजघातकी सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी, आणि या केसचा खटला हा जलद गती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.जर का न्याय नाही मिळाला तर नाना पाटील. चौकात रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी अजित मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, राहुल गुंजाळ, राहुल शिलवंत, राजू पठाण उपस्थित होते.














