Home महाराष्ट्र हक्काच्या राहत्या घरासाठी लोहार कुटुंबीयांचे अमरण उपोषण

हक्काच्या राहत्या घरासाठी लोहार कुटुंबीयांचे अमरण उपोषण

777

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.6फेब्रुवारी):-म्हसवड, ता. माण, जि. सातारा येथील लोहार कुटुंबीय आपल्या हक्काच्या राहत्या घरासाठी आजपासुन म्हसवड नगरपालिके समोर अविल पांडुरंग लोहार, कुमार पांडुरंग लोहार, विनोद पांडुरंग लोहार हे आपल्या कुटूंबासह अमरण उपोषणास बसले असून आम्हाला जो पर्यत न्याय मिळत नाही आणि नगरपालिकेने दिलेली नोटीस मागे घेत नाहीत तो पर्यत आम्ही आमच्या कुटूंबासह उपोषण चालूच ठेवणार असल्याचे विनोद लोहार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना विनोद लोहार म्हणाले की आम्ही म्हसवड गावचे रहिवाशी असून 1970 सालापासुन स. नं. 486 मध्ये आमचे घर आहे व तेथे आमचे वास्तव्य आहे याबरोबरच याच ठिकाणी आमचा छोटासा पिढ्यानंपिढ्याचा लोहार कामाचा व्यवसायही आहे परंतु दि. 04/02/2025 रोजी नगरपालिकेने आम्हाला आमचे राहते घर अतिक्रमण असून ते चोवीस तासाची मुदत देऊन ते काढून घेण्याची मुदत दिली आहे त्याआधी दि. 08/01/2025 रोजी एक नोटीस दिली होती.

आम्ही आमच्याकडील सर्व पुरावे नगरपालिकेला दिले आहेत परंतु आमच्या पुराव्या चा विचार नं करता घर काढण्यासाठी माझ्यावर व माझ्या कुटूंबावर दबाव टाकला जातं आहे भीती दाखवली जातं आहे आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी म्हणून अमरण उपोषणास नाईलाजाने कुटूंबासह बसावे लागले आहे इथे जर आम्हाला. न्याय नाही मिळाला तर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कुटूंबासह उपोषण करणार असल्याचे आणि आमचा हक्क मिळणार असल्याचे लोहार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here