


✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.6फेब्रुवारी):- येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेमध्ये सौ. शितल बाळासाहेब डफळ प्रथम, सचिन चव्हाण पाथर्डी द्वितीय, दत्तात्रय खामकर तृतीय, क्रमांक मिळालेल्या असून उत्तेजनार्थ उर्मिला गायकवाड, ओंकार उदारे, प्रबोधिनी पठाडे यांना पारितोषिके जाहीर करण्यात येत आहेत. अशी माहिती राज्य संघटक प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी दिली.
कथालेखन स्पर्धेमध्ये विनय पिंपरकर सावेडी, प्रथम तर भाऊसाहेब साहेबराव गवळी, द्वितीय,कु. दुर्गा विजय कवडे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत चंद्रजीत मोरे जळगाव प्रथम, स्वाती पुरी द्वितीय तर समृद्धी संतोष सुर्वे तृतीय क्रमांक जाहीर करण्यात येत आहे.
रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होत असलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या शुभहस्ते संमेलनामध्ये सदर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागत अध्यक्ष संपत दादा बारस्कर, कवयित्री शर्मिला गोसावी कवी मारुती सावंत कार्यवाह भारत गाडेकर यांनी केले आहे














