


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.4जानेवारी):-लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीची अध्यक्षपदाची धुरा लॉ.जगदीश तोतला यांनी हाती घेतली तेव्हापासून जनसेवेचे वृत्त हाती घेऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने मागील सात महिन्यांमध्ये लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या माध्यमातून क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन एकूण 47 समाज उपयोगी कार्य केले ज्यामधे शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, सामाजिक व व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले.
या कामाची दखल घेत लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीला सर्वोच्च ऍक्टिव्हिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (दि.2 फेब्रुवारी रविवार) रोजी परभणी येथील हॉटेल रामायना येथे लॉयन्स क्लब इंटरनॅशनल विभागीय परिषदेचे आयोजन रिजन चेअरपर्सन लॉ.प्रिया ठाकूर यांच्यावतीने करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गिरीश सिसोदिया हे होतें तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडीजी लॉ.राहुल औसेकर, व्हिडीजी लॉ.अश्विन बाजोरिया, लॉ.डॉ
प्रवीण थडवे,लॉ.सुप्रिया कोतवाल, लॉ.आवी टाक व लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या परिषदेमध्ये एकूण बारा क्लबनी आपला सहभाग नोंदवला होता बारा क्लब पैकी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीनी सर्वात जास्त समाज हिताचे कार्य केल्याबद्दल सर्वोच्च ऍक्टिव्हिटी पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार स्वीकारताना लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीचे अध्यक्ष लॉ.जगदीश तोतला,सचिव लॉ.भगत सुरवसे, लॉ.अतुल गंजेवार,लॉ.गोविन्द रोडे, लॉ.मकरंद चिनके, लॉ. प्रदीप गुंडाळे, लॉ.चंद्रकांत गादेवार, लॉ.श्रीद्धराचार्य जोशी, लॉ.उमेश पापडू,लॉ.महेंद्र वरवडे, लॉ. गोपाळ मंत्री,लॉ.सदानंद पेकम, लॉ.ज्ञानेश्वर गुंडाळे, लॉ. अमोल पेचफुले,लॉ.महेमुद शेख आदींची उपस्थिती होती.
पुरस्कार मिळाल्याबद्दल लॉयन्स क्लब गोल्डसिटीचे अध्यक्ष लॉ.जगदीश तोतला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की उरलेल्या कार्यकाळामध्ये यापेक्षाही अनेक समाज हिताचे कार्य क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.या कार्यक्रमात लॉ.जगदीश तोतला यांची एम.जे.एफ पदी निवड करण्यात आली निवड झाल्या बदल तोतला यांच्यावर लॉयन्सच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे














