


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.31जानेवारी):-शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कोद्री रोडवरील रेल्वे उडानपूल मंजूर झाले आहे राजकीय हितापोटी होणारा विरोध मोडीत काढीत येणाऱ्या 2024 च्या अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षा अंतर्गत मंजूर उडानपूल तात्काळ करण्यात यावा अशी मागणी (दिनांक 27 जानेवारी) रोजी तहसीलदार यांच्याकडे उडानपूल कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
गंगाखेड शहराचे वाढते विस्तारीकरण कोद्री रोडवरील ग्रामीण भागाचा 70 टक्के भाग याच मार्गावर सर्व प्रशासकीय कार्यालय महाविद्यालय असून सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे दळणवळण जीव घेणे झाले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत या मार्गावरील रेल्वे फाटक वारंवार लागत असल्याने रुग्णांना आपला जीव सुधा गमवावा लागत आहे.
कुठलाही भेदभाव न करता उडानपुलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी शहरातील प्राचार्य, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील उडानपूल कृती समितीचे सदस्य बालाजी मुंडे,प्रा.शंकर वाघमारे, दिगंबर गोबाळे,संभाजी पोले, प्रामारुती साळवे,प्रा.बजरंग धूत,भागवत मुंडे, प्रा.बालाजी ढाकणे,लक्ष्मण लटपटे, विश्वनाथ बिडगर,गोविंद लटपटे प्रा.अमोल ढाकणे,बंडू ओझा,संदीप राठोड, प्रा.गोविंद चोरघडे, संभूदेव मुंडे, अँड.राजू देशमुख,प्रताप मुंडे,भगीरथ फड,राजाभाऊ फड ,मनोज मुरकुटे, मनोहर वावळे,सुमित कामत,निवृत्ती भेंडेकर, गणेश राठोड, श्रीमंत नागरगोजे, सुधाकर कुसळे, मुंजाराम मुंडे,भरत भेंडेकर,प्रतापसिंह ठाकुर, संभाजी वाडेवाले,अशोकराव मुंडे, पांडुरंग लटपटे,रमेश खांडेकर,संजय शृंगारे,विश्वनाथ सोनर,अशोकराव मुरकुटे,रामकिशन मुंडे,वैजनाथ कांबळे, रावसाहेब गुट्टे यांच्या वतीने करण्यात आली आहे निवेदनावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत














