Home महाराष्ट्र इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय येथे सत्यशोधक समाज...

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा !

237

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.25जानेवारी):-शहरातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.6 जानेवारी 2025 रोजी सत्यशोधक समाज संघ जळगाव आयोजित व लेखक पी.डी.पाटील लिखित महामाता या पुस्तकावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली व प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या एस.एस.पाटील व संदिपकुमार सोनवणे यांच्या हस्ते ग्रंथ, सत्यशोधक दिनदर्शिका व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील,आदर्श प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील,ज्यु.कॉलेज विभाग प्रमुख एस.एन.चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एन.बी.पाटील,निवृत्त ज्येष्ठ लिपिक डि.एस.वाणी उपस्थित होते .

         याप्रसंगी इंदिरा गांधी विद्यालयातील विजयी प्रथम रोशनी बाळू सोनवणे, द्वितीय दुर्गा नारायण कोळी, तृतीय शुभांगी मोतीलाल महाले तर आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम जानवी झुंबरलाल पाटील,द्वितीय राजश्री रतिलाल पाटील, तृतीय शितल राजेंद्र पाटील यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.बी.पाटील,जी.पी.चौधरी,पी.सी.पाटील,एस.एम.देशमुख, पी.पी.पाटील,एस.ए. शिरसाठ, के एन पाटील,ए.एम.गावित,पी. डी.पवार,बी.बी.पवार, ए.एस.सुर्यवंशी, डॉ. डी.बी.बोरसे, यतीन पाटील, सुधीर महाले,किरण बडगुजर,विजेंद्र पाटील, स्मिता चव्हाण, महाजन, आर.बी.विश्वंभर,चेतन बेडसे, विकास सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here