


🔺पुरातत्व विभागाचा कानाडोळा
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चंद्रपूर(दि.24जानेवारी):-मूल तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले चांदापूर हे गाव ऐतिहासिक व धार्मिक बाबतीत नावलौकीकास प्राप्त असले तरी या गावाकडे पुरातत्व विभाग व शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .
चांदापूर ज्या टेकडीवर बसलेय आणि सभोवताली असलेल्या टेकड्यांवर कित्येक ऐतिहासिक घटना घडल्या असतील पण त्याची नोंद आणि टेकड्यांवर असलेल्या गुंफा व बारव अजूनही दुर्लक्षित आहेत .
गावाच्या मध्यभागी एक पुरातन बारव असून त्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने तिथे घाणीचे साम्राज्य वास करीत असल्याचा प्रत्यय झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव लक्ष्मण खोब्रागडे व त्यांचे सहकारी केदारनाथ सोनूले व जितेंद्र लेनगुरे यांना त्याच गावात कार्यरत मुख्याध्यापक अनिल नैताम व विषय शिक्षक रुपेश परसवार यांनी आणून दिला.
त्याची दखल घेत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांनी या ऐतिहासिक बारवचे पुरातत्व विभागाने जीर्णोद्धार करून अनमोल वारस्याचे जतन करावे. अशी मागणी याद्वारे शासनाकडे केली आहे .














