Home चंद्रपूर माहिती संचालक श्री डा गणेश मुळे यांची पत्रकारांसोबत चर्चा-लघु वृत्तपत्रांच्या समस्यांकडे लक्ष...

माहिती संचालक श्री डा गणेश मुळे यांची पत्रकारांसोबत चर्चा-लघु वृत्तपत्रांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन

259

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24जानेवारी):- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपुर विभागीय संचालनालयाचे विभागीय संचालक श्री डा गणेश मुळे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर प्रथमच चंद्रपुर ला भेट दिली.

  जिल्हा माहिती कार्यालयात त्यांनी चंद्रपुर येथील पत्रकारांसोबत चर्चा करुन महाराष्ट्र शासनाच्या विकास योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी चंद्रपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वैभव पलीकुंडावार , सरचिटणीस सुनील तिवारी, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे केंद्रीय प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास, रविंद्र नागापूरे, माजी कार्याध्यक्षा सौ. कल्पनाताई पलीकुंडवार यांनी पुष्पागुच्छ देऊन संचालक श्री गणेश मुळे यांचे स्वागत केले. या प्रसंगी विविध पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

      चर्चा करत असतांना जिल्हा मराठी पत्रकार संघाने संचालक महोदयांच्या लक्षात आणुन दिले कि, महाराष्ट्र शासन राज्यात करत असलेल्या विविध विकास कामांची माहिती जिल्हा वृतपत्रे साप्ताहिक वृत्तपत्रेच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करतात परंतु जाहिराती देतांना शासनाद्वारे लहान मोठ्या वृत्तपत्रांमधे भेदभाव करण्यात येतो. भविष्यात भेदभाव होणार नाही याकड़े लक्ष देण्यात यावे, विधान सभा निवडणुकी पूर्वी महाराष्ट्र शासनाने विशेष जाहिरात अभियानाअंतर्गत दहा जाहिराती मोठ्या वृत्तपत्रांना दिल्या, परंतु साप्ताहिक वृत्तपत्रांना फक्त एकच जाहिरात दिली.

  भविष्यात शासनाच्या विविध जाहिराती देतांना आश्या प्रकारे भेदभाव होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

      महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात धोरणानुसार शासनाच्या विविध विभागांद्वारे जाहिराती दिल्या जातात. शासनाच्या जाहिरात धोरणानुसार देयकांची अदायगी तीन महिन्यात करण्यात येईल, परंतु कांही विभाग दोन दोन वर्षे देयके देत नाही. याची दखल घेऊन सर्व विभागांना योग्य वेळी देयके देण्याचे निर्देश देण्यात यावे. संचालक महोदयांनी सर्व विभागांना पत्र देण्याचे मान्य केले.

     शासनाच्या जाहिरात धोरणानुसार राज्यातील सर्व विभागांनी, सर्व नगरपालिका, महानगरपालिका, सर्व महामंडळ आदिंनी अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग दैनिके आणि साप्ताहिकांना रोटेशन प्रणालीने जाहिराती द्याव्यात असे स्पष्ट निर्देश आहेत पण कांही विभाग या जाहिरात धोरणाचे पालन करत नाहीत. त्यांनी आपले नियम तयार केले. सर्वांनी शासकिय जाहिरात धोरणानुसारच जाहिराती दिल्या पाहिजे. या संदर्भात सर्वांना निर्देश द्यावे. विद्युत विभागाच्या जाहीराती पूर्वी शासकिय धोरणानुसार सर्व साप्ताहिकांनाही रोटेशन प्रणालीने प्राप्त होत होत्या, पण त्यांनी आपले नियम तयार करुन सर्व लघु वृत्तपत्रांवर अन्याय केलेला आहे. हा अन्याय दुर करून शासनाने लघु वृत्तपत्रांना न्याय द्यावा.

      माहिती संचालक श्री गणेश मुळे म्हणाले, मी देखील पत्रकार होतो, मला पत्रकारांच्या विविध समस्या माहित आहेत, मी लघु वृत्तपत्रांच्या समस्यांकडे लक्ष देईन अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांना दिली.

     संचालक श्री गणेश मुळे म्हणाले, राज्य सरकारने सामान्य लोकांना शासनाच्या सेवा तत्परतेने प्राप्त करुन देण्यासाठी पाऊले उचललेली आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्या साठी प्रसारमाध्यमांची भुमिका महत्वाची आहे. शासनाने पहिल्या 100 दिवसात करावयाच्या कामांचे नियोजन केलेले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेचा ( आर्टिफिशियल इंटेलीजेंन्स) चा वापर करण्यात आलेला आहे. पत्रकारांनी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशी सुचना दिली.

    या साठी प्रशिक्षण कार्यशाळा आवश्यक असल्याने ती घेण्यात यावी या सुचनेला लगेच प्रतिसाद देऊन लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रशिक्षण कार्यशाला घेण्याचे जाहिर केले.

       चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात सहायक माहिती अधिकारी आदि पदे रिक्त असल्याने जिल्हा माहिती अधिकारी आणि कर्मचारीवर्गावर कामाचा ताण अधिक पडतो म्हणुन रिक्त पदे लवकर भरण्यात यावी, जेणे करुन चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालय अधिक कार्यक्षम होईल. माहिती विभागाला पत्रकार संघांचे योग्य सहकार्य प्राप्त होत राहिल.

         या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आणि विविध पत्रकार संघांचे पदाधिकारी ही उपस्थित होते.सर्व पत्रकारांनी चर्चेत सहभाग घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here