


अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी, मो 86985 66515
गंगाखेड : येथील जुन्या आणि नामांकित संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची केंद्र सरकारच्या पीएम ऊषा योजनेत निवड झाली आहे. या योजनेअंतर्गत करावयाची खरेदी आणि निधी विनियोगासंदर्भात प्रशासकीय समितीची बैठक आज दि. १५ जानेवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी ( आयक्यूएसी ) कक्षात संपन्न झालेल्या बैठकिच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा. डॉ. आत्माराम टेंगसे हे होते. संस्था सचिव ॲड संतोष मुंडे, सहसचिव दशरथ चौधरी, प्राचार्य तथा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे सचिव प्रा. डॉ. बी. एम. धुत, समिती सदस्य गोविंद यादव, पंकज भंडारी आदिंची ऊपस्थिती होती.
शिक्षा निती २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवसायाभीमूख शिक्षण देण्याबरोबरच महाविद्यालये आधुनिक तंत्रज्ञान युक्त बनवले जाणार आहेत. तसेच महाविद्यालयांचा लाभ केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता तो समाजालाही व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेत गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयाची निवड झाली आहे. याअंतर्गत संस्थेस अनुदान मंजूर झाले असून पहिला हप्ता प्राप्तही झाला आहे. या निधीचा विनियोग, योग्य साहित्य खरेदी आदी बाबतचे निर्णय आज संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांनुसार अनेक अत्याधुनिक यंत्र सामग्रीची खरेदी केली जाणार आहे. ज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना करून दिला जाईल. याबरोबरच महाविद्यालय आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केले जाणार आहे. सर्वांच्या सहयोगातून ही योजना यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. बैठकीचे प्रास्तावीक प्रा. डॉ. एस व्ही क्षीरसागर यांनी केले. तर ऊपस्थितांचे आभार प्रा. डॉ. डी. जी. ऊजळंबे यांनी मानले.














