


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.14जानेवारी):-सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो. तुम्ही सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ दिनदर्शिका तयार केलेबद्दल तुमचे प्रथम अभिनंदन करतो.
दुसरे म्हणजे तुम्ही जे उद्दिष्ट सांगीतले, तुमच्या कार्यप्रणालीचे वैशिष्टय सांगीतले पे बँक टू सोसायटी असे वैशिष्ट्य सांगीतले.
पे बॅक टू सोसायटी ही चांगली कल्पना आहे. आपण इथपर्यंत पोहोचलो शिक्षक झालो. आपणाला नोकऱ्या मिळाल्या आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. पण हे करत असताना आपल्यावर समाजाचे काही ऋण आहे हे देखील आपण विसरता कामा नये. एकतर आपल्या पूर्वीच्या महामानवांनी त्यात स्त्री पुरुष दोन्ही आले. त्यांनी जे समर्पण केलं त्यामुळे या नव्या युगामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या आहेत म्हणून आपण हे स्थैर्य प्राप्त करू शकलो आहोत म्हणून त्यांचेविषयी कृतज्ञता ठेवणं जाणीव ठेवणं आणि शक्य होईल तेवढं काही ना काही समाजासाठी करणं हे आपलं कर्तव्य आहे.आपले कुटुंब आहे. आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या टाळून आपण समाजकार्य करावं अस मी म्हणणार नाही. त्या जबाबदाऱ्या योग्य त्याप्रकारे पार पाडून देखील
आपण समाजकार्य करू शकतो. पैशाचीच मदत केली पाहिजे अस मी म्हणत नाही. पैसा केवळ देणं म्हणजे पे बॅक टू सोसायटी नाही.
पैसा देणं हे ये बॅक टू सोसायटी आहे तसेच समाजकार्यासाठी वेळ देणंही पे बॅक टू सोसायटी आहे. अस मला वाटतं. तुम्ही ज्या रितीने वेळ देत आहात काम करत आहात त्याबद्दल तुमच प्रथम अभिनंदन करतो. तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही असेच पुढे कार्य
करत रहाल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. व आभार व्यक्त केले. प्रास्ताविकात महेश लोखंडे जिल्हासचिव सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ यांनी संघटनेचे सेवाभावी कार्य थोडक्यात विशद केले.
सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष उदय भंडारे यांनी तात्या आ. ह. साळुंखे यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी जावळी तालुका अध्यक्ष नीतीन जाधव, कोरेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, पाटण तालुका अध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रविण लादे, शारदा लोकरे, पुजा भंडारे, अजित वाघमारे, माण तालुका अध्यक्ष विनायक पालसांडे, माण तालुका सचिव श्रीकांत सावंत, जिल्हा संघटक दत्तात्रय कोलवडकर, अनिल पवार, पिलेवान सर, किरण घोलप असे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.














