Home महाराष्ट्र धर्मराज कन्या विद्यालय नवेगाव पांडव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 

धर्मराज कन्या विद्यालय नवेगाव पांडव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 

170

 

संजय बागडे, नागभीड तालुका प्रतिनिधी मो. 91689 86378

नागभीड – धर्मराज कन्या विद्यालय, नवेगाव पांडव, ता. नागभिड येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. उद्घाटन समारंभ दिनांक 23 डिसेंबर 2024 ला डॉ. अमीर धम्मानी, सेवानिवृत्त प्राचार्य यांचे शुभ हस्ते तर मालाताई देशमुख, अध्यक्षा प्रियदर्शनी शिक्षण संस्था मोहाळी (मो.) यांचे अध्यक्षतेखाली व संतोष रडके, भाजपा तालुकाध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. अतुल नागपुरे, प्राध्यापक राष्ट्रपिता महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय नागभीड, तसेच मनोज लडके, गोपीनाथ भोयर, अमित देशमुख, भंडारे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नागभीड, श्री संजय पालवे सर यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पपिता चावरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.
दिनांक 24 डिसेंबर 2024 ला बक्षीस वितरण व समारोपीय समारंभ कार्यक्रम संजय पालवे, गटशिक्षणाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तर श्रीमती सुनिता भंडारे मॅडम, नैना टेकाम, मुख्याध्यापिका सौ. पपीता चावरे, सौ. श्वेता राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे संचालन मोटघरे केंद्रप्रमुख तर आभार श्री राऊत, विषय तज्ञ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.जी. बोरकुटे, बी.टी. पांडव, डी. आर. नन्नावरे,पी. आर. उरकुडे, सौ. अर्जुंकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here