


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.24डिसेंबर):-भिमा कोरेगांव संग्रामाच्या शहीदाना अभिवादन करून मानवंदना देण्याच्या उद्देशाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन 2 जानेवारी 2025 रोजी बि.पी.एड.ग्राऊंड चिमूर येथे करण्यात आले आहे.
भिम आर्मी ( भारत एकता मिशन ) व आजाद समाज पार्टी तालूका चिमूर च्या वतीने आयोजीत कार्यक्रमामध्ये सकाळी समता सैनीक दल चिमूर च्या वतीने प्रतिकात्मक विजयस्तंभाला अभिवादन व भिख्खू संघाला सलामी देण्यात येईल. सायंकाळी नामांकीत सुप्रसिद्ध कलाकाराचा समाज प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम होईल. यामध्ये सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी मुंबई, सुप्रसिद्ध गायक विजय पारखी, सुप्रसिद्ध गायक सुमीत भिमटे चंद्रपूर यांचा समावेश असणार आहे.
१ जानेवारी १८१८रोजी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे पेशवाई विरुद्ध झालेल्या लढाईत महार रेजीमेंटने आपल्या शौर्याचा परिचय देत समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय या मुल्यांचे रक्षण केले होते. ह्या दिवसाची आठवण नवीन पिढीला व्हावी व सदर मुल्ये समाजात रुजावी ह्याकरीता सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमीत भिमटे (आजाद समाज पार्टी तालुका अध्यक्ष ) यांनी सांगीतले.
कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी जनतेने व समतामुलक विचारकानी उपस्थित रहाण्याचे आवाहन अमीत भिमटे, अजय गजभिये, शुभम गजभिये, निखिल रामटेके,सुमित गजभिये, अंकित दहिवले, सागर बोरकर, दीक्षांत शेंडे,टिनू गजभिये, आर्यन मेश्राम, चिराग पाटील,हर्षल गजभिये, पियुष वरखेडे,वेदांत बोरकर, तेजस शेंडे, नैतिक पाटील, प्रशिक बहादुरे, निलेश आत्राम आदी ने केले आहे.














