


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा. 9075686100*
म्हसवड . – जिल्हा परिषद अधिनस्त असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचारी / अधिकारी यांच्या वर होणाऱ्या अन्याय – अत्याचाराच्या घटना वाढत असताना जि प . प्रशासन यावर ठोस भुमिका घेत नसुन मागासवर्गीयांच्या बैठकां फक्त कागदावरच घेण्याचा केविलवाणा प्रयोग सातत्याने करत असुन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बैठक यापूर्वी झाली असुन , त्या बैठकीतील बरेच विषय प्रलंबित आहेत . ते प्रलंबित विषय प्राधान्य क्रमाने सोडवताना जि प . प्रशासन दिसत नाही . फक्त वरिष्ठ कार्यालय नेहमी विचारणा करतय म्हणुन या बैठका लावल्या जात आहेत . शासनाचे धोरण आहे कि मंत्रालय पातळी वर मागासवर्गीय संघटनाच्या तक्रारी वारंवार येत असुन त्या तक्रारीचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी संघटनाना तिमाही बैठका जि प . स्तरावर घेण्याचे शासनाचे धोरण आहे . मात्र सदर च्या बैठका फक्त कागदावर घेवून मागासवर्गीय कर्मच्या ऱ्यांच्या सेवा विषयक अडी अडचणी सोडवण्याच्या धोरणात्मक निर्णयाला हरताळ फासण्याचे काम जि . प . प्रशासनाकडून सातत्याने होत आहे , तसेच बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या , मुदत पुर्व बदल्या , पदोन्नती देताना मागासवर्गीयां वर जाणीवपुर्वक अन्याय होत आहे . भरती मध्ये आरक्षण धोरणाची सातत्याने पायमल्ली होत आहे . जि.प मध्ये मागासवर्गीय कक्ष जाणीवपुर्वक कार्यान्वीत केला जात नाही . मागासवर्गीय कर्मचारी यांचेवर चुकीचे मापदंड लावून बेकायदेशीर विभागीय चौकश्या लावल्या जात आहेत . वरिष्ठांचे आदेश असताना जाणीवपुर्वक कास्ट्राईब कर्मचारी महासंघास जि . प . आवारात कार्यालय दिले जात नाही . बेकायदेशीर प्रतिनियुक्तीस जि . प . . सा . प्र . चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . निलेश घुले व काही खाते प्रमुख यांचे अभय आहे . या व इतर प्रश्नावर तात्काळ जि.प . प्रशासनाने तोडगा काढावा , त्यानंतर संघटना विषय पत्रिका देईल त्या विषय पत्रिके नुसार बैठकीच्या अगोदर विभाग निहाय आकडेवारी संघटनेस सादर केल्यानंतर बैठकीस संघटना उपस्थित राहील .
दि . २७ नोव्हेबर २४ च्या बैठकी वर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ बहिष्कार टाकत आहे .














