Home महाराष्ट्र भटक्या विमुक्तांनी एकत्र येऊन मंत्रालयावर धडक मारणार

भटक्या विमुक्तांनी एकत्र येऊन मंत्रालयावर धडक मारणार

212

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड — आज विमुक्त दिनानिमित्त आष्टा ता.वाळवा येथे राज्यव्यापी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भटक्या विमुक्तांचे नेते अॅड.अरुण जाधव यांनी घणाघाती प्रहार केला.ते बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून 78वर्षे झाली तरी भटक्या विमुक्तांच्या आयुष्यातील विवंचना संपत नाही.सध्याच्या आधुनिक काळातही भटक्यांना शिक्षण,अन्न,निवारा, कागदपत्रे व मुलभूत गरजांसाठी धावाधाव करावी लागत आहे, त्यामुळे यापुढे भटक्या जमातीतील सर्व 42जातींनी संघटीत होऊन आता व्यवस्था उलथून टाकली पाहिजे.आता आपण याचक न होता,,,सत्तेला आव्हान दिले पाहिजे.त्यासाठीच 31आॅगस्ट ते 23सप्टेंबर अखेर महाराष्ट्र राज्यभरात संवादयात्रा निघाली आहे, त्याच्या दुसरा दिवशी आष्टा येथे भटक्या विमुक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी संघटक सतिश शिकलगार, रमेश तात्या मोरे, प्रकाश मोरे, या कार्यक्रमात स्वागत अशोक मदने यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक मुनीर शिकलगार यांनी, सुत्रसंचलन सागर माने यांनी केले. तर मारूती शिरतोडे,जयराज घाडगे,मोहन भिंगार्डे, रामभाऊ थोरात, सुनील गुरव, दिगंबर लोहार, ललिता धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार प्रदर्शन राहुल मोरे यांनी केले.यावेळी डोंबारी समाजातील अघोरी जातपंचायत निर्मुलन केल्याबद्दल समाजभूषण रमेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम सुरुवातीला सांगली येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात भटके विमुक्त जमातींच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले.ही संवाद यात्रा 20तालुके,40तालुके,5विभाग व एकूण 3500किमी.प्रवास करून 23तारखेला मुंबई येथे मंत्रालयावर धडक देणार असल्याचे संयोजक अॅड.अरुण जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here