Home लेख सर्वश्रेष्ठ राष्ट्रपतीपदी बसलेली व्यक्ती निराश आणि भयभीत कशी असू शकते?

सर्वश्रेष्ठ राष्ट्रपतीपदी बसलेली व्यक्ती निराश आणि भयभीत कशी असू शकते?

640

 

 

 

 

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू महोदया, आपण एक शूद्र स्त्री आहात आणि त्यात तूम्ही आदिवासी समाजातील विधवा स्त्री आहात. आपणास मनुवादी विचारांच्या मनुस्मृती नुसार अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय लागली आहे. आपणास महामहीम राष्ट्रपती पद हे मनुवादी मनुस्मृतीच्या आचारसंहिते मुळे मिळाले नाही तर भारतीय संविधानामुळे मिळाले आहे. हेच आपण विसरला आहात. पण आपण मानसिक आणि वैचारिक गुलामी सोडायला तयार नसल्यामुळेच आपण निराश आणि भयभीत आहात. आपण संविधान वाचले असते तर आपण संविधानाने आपणास दिलेल्या अधिकाराचा योग्य तो वापर करून जगात नांव कमावून इतिहासात सुवर्ण अक्षरात नांव कोरले असते. आपल्यात आणि सर्कस मधील हिंस प्राण्यात काय फरक आहे?

धनधाकड शरीर असलेला मानव, प्राणी चाबूकाचा गुलाम असतो. मालकाच्या हातात चाबूक दिसला की प्राणी घाबरतो तसाच माणूस पण घाबरतो. हा निसर्गाचा नियम आहे. मनुवादी मानसिकता आणि वैचारिक गुलामी भारतीयांना हजारो वर्षापासून गुलाम बनवत आली आहे. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मनुस्मृतीने नाकारला. त्याचं एकूण 85 टक्के मागासवर्गीय, आदिवाशी, अल्पसंख्याक समाजाच्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला. पण मागासवर्गीय एस सी, दलित, मुस्लिम आणि आदिवाशी समाजाच्या लोकांना समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून देशाला दाखविण्यासाठी देशातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रपतीपद दिले. त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला नाही. तर सर्कस मधील प्राण्या सारखे आचरण करून आम्ही मनुवादी मानसिक व वैचारिक गुलाम आहोत हे जगाला दाखऊन दिले. म्हणूनच सर्वश्रेष्ठ राष्ट्रपतीपदी बसणारी व्यक्ती मी निराश आणि भयभीत आहे असे बोलून दाखवते. त्या ऐवजी अधिकाराने राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करून महिलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना जेल मध्ये टाकण्याचा आदेश देऊ शकला असतां. असे अनेक निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. मणीपुर मध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा आपण काहीच बोलल्या नाही. किंवा आज पर्यन्त माणिपूरला साधी भेट देण्याची हिंमत आपल्यात नाही. आपण सुशिक्षित मनुवादी मानसिक व वैचारिक गुलाम आहोत हे जगाला दाखऊन देत आहात.
देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले १३१ मागासवर्गीय खासदार आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक खासदार भारत देशाचा सर्वोच्चपदी म्हणजे राष्ट्रपतीपदी आहे, एक ओबीसी खासदार देशाचा प्रधानमंत्री आहे. ही घटना साधी नाही तर लोकशाहीने दिलेल्या संविधानिक मूल्याचा सर्वात मोठा मान सन्मान आहे. परंतु हे त्या समाजाचे प्रतिनिधित्व करीत नाही. तर आपल्या सोयीनुसार ब्राम्हणशाहीने मनुवादी मानसिक व वैचारिक गुलाम सर्वश्रेष्ठपदी बसून त्यांना हवी त्याप्रमाणे मनुस्मृती आचरणात आणत आहेत.हे जगाला दाखऊन देत आहेत. तरी मागासवर्गीय खासदार, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आपल्या सामाजिक जबाबदारीशी प्रामाणिक न राहता वैचारीक गुलाम म्हणून इनामदारी ने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपण गुलाम आहोत यांची त्यांना संपुर्ण जाणीव आहे. मग या वैचारिक गुलामला जाणीव कशी करून देणार? हा आज देशातील मागासवर्गीय समाजा समोरचा मोठा प्रश्न आहे. या मागासवर्गीय लोकांना समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून कोणी निवड केली? ब्राम्हणशाहीचे व्यवस्थापन करणाऱ्या आर एस एस च्या भटा ब्राम्हणांनीच नां?

मागासवर्गीय बहुजन समाजातील पक्षाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान मानणारा क्रांतिकारी विचार मानणारा स्वाभिमानी ओबीसी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती झाला असता काय? मग बहुसंख्य हिंदुत्ववादी, मनुवादी विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी ओबीसी प्रधानमंत्री व मागासवर्गीय राष्ट्रपती कोणत्या गुणवत्तानुसार निवडल्या गेले तर एकच गुणवत्ता आहे ती म्हणजे वैचारिक गुलाम.
ही मोहनदास करमचंद गांधी यांच्या येरवडा जेल पुणे येथील आमरण उपोषणाला बसल्या नंतर झालेली उत्पत्ती आहे. त्यालाच पुणे करार म्हणतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वाभिमानी समाजाला वाचविण्यासाठी मजबुरीमुळे केलेला समझोता म्हणजेच पुणे करार होता. त्याचं गुलामांचा वापर करून आज देशातील लोकशाही संपविण्याचे काम मनुवादी विचारांचे लोक करीत आहेत. सर्वश्रेष्ठ राष्ट्रपतीपदी बसणारी व्यक्ती म्हणते मी निराश आणि भयभीत आहे असे बोलून दाखवते. का पदाचा अधिकार गाजविण्याची हिंमत का नाही करत? आज पदावर असे पर्यन्त आपण सर्वश्रेष्ठ आहात. हे जगाला दाखवून देण्याची वेळ आहे. मी निराश आणि भयभीत नाही तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची वाघीन होऊन देशातील महिलावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना उभा फाडून टाकण्याची हिंमत माझ्यात आहे हे दाखवून देण्याची आणि करून दाखवण्याची वेळ आहे. देशातील शासन प्रशासन एका दिवसात सरळ करणारी सुरक्षा यंत्रणा आपल्या अधिकारात आहे. हेच महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू विसरल्या आहेत. म्हणूनच त्या निराश आणि भयभीत असल्याचे जाहीर पणे सांगतात. नव्हे आपण सुशिक्षित मनुवादी मानसिक व वैचारिक गुलाम आहोत हे जगाला दाखऊन देत आहेत.
सर्वश्रेष्ठ संविधानिक पदी ओबीसी, मागासवर्गीय गुलाम बसविल्यामुळे कोणतेही मानसिक गुलाम नेतृत्व स्वतःच्या किंवा संविधानाच्या चौकटीत काम करू शकत नाही. तो गुलाम स्वतःसह सर्व ओबीसी, मागासवर्गीय समाजाला कायमस्वरूपी गुलाम बनविण्यासाठी काम करीत राहील. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी होणार नाही, यासाठी प्रथम समता, स्वतंत्र, बंधुभाव, एकता सर्वधर्मसमभाव ही चौकट मोडावी लागेल. ती तोडण्यासाठी संविधानात दिलेले मूलभूत अधिकार, सनदशीर कायदे कानून, कलम बदलल्या शिवाय मनुवादी, हिंदुत्ववादी विचारांची अंमलबजावणी होणार नाही हे सर्व काम ओबीसी, मागासवर्गीय गुलामांच्या हातुन त्यांच्या नांवाने सहीने आज देशात होत आहे. त्याला सर्वच ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाज मूकपणे साथ देतो किंवा तो ही त्यांची मानसिक गुलामी सहन करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व नाशाला तोच जबाबदार असेल.
आर एस एस प्रणित भाजपा एकमेव पार्टी नाही तर तिला ४६ छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा पाठिंब्यामुळे ती मजबूत होत आहे. हे ४६ पक्ष मागासवर्गीय, बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनविण्यासाठी कुराडीच्या दांड्याचे काम करीत आहेत. हे स्वार्थासाठी आंधळे, बहिरे आणि मुके झाले आहेत. त्यात रामदास, उदीतराज हे लक्षवेधी गुलाम आहेत. या गुलामला जाणीव कशी करून देणार? आर एस एस ने सर्व साम, दाम,दंड,भेद नीती वापरून या पक्षांना सहयोगी गटबंधन, ठगबंधन आणि राजकीय सौदेबाजी केली आहे. त्यामुळे हे सर्व पक्षाचे नेतृत्व करणारे नेते गुलाम झाले आहेत.
संत,महापुरुषांच्या, महात्माच्या क्रांतिकारी विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नेते यांनी गांभीर्याने विचार करून मार्ग काढला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली तेव्हा जी खंत व्यक्त केली होती, जर माझा समाजाची राख रांगोळी होऊन तो जिवंत राहत नसेल तर मी जिवंत राहून काय उपयोगाचे? मणीपुर मधील आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली जात असतांना आदिवासी समाजाचा रक्तपात होत असतांना देशाच्या सर्वश्रेष्ठ पदी बसलेली आदिवासी महिला काहीच बोलली नाही, काही करू शकली नाही. ती काय कामाची? मिळाल्या पदाचा मान सन्मान ठेवता येत नसेल तर राष्ट्रपती भवनात आत्महत्या करावी. त्याची जगात नोंद तरी घेतली जाईल.

ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजाची आजची परिस्थिती तशीच आहे. ८५ टक्के समाज असूनही त्यांच्यावर ३ टक्के लोकसंख्या असलेला समाज त्यांना गुलाम बनवीत आहे. कारण ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजात एकी नाही. एकमेकांवर विश्वास नाही. म्हणून त्यांना गुलामी स्वीकारावी लागत आहे. समाजाचे किंवा देशाचे नेतृत्व करण्यासाठी वयाची अट नसते. तर वैचारिक धाडस आणि इच्छाशक्ती पाहिजे. सर्वच मागासवर्गीय समाजाच्या नेतृत्वाने ते गमावलेले दिसते. म्हणूनच ते सर्वश्रेष्ठपदी बसलेले असतांना ही मी निराश आणि भयभीत आहे हे कशी बोलू शकते?मनुवादी मानसिकत आणि वैचारिक गुलामी सोडली तर देशात सामाजिक राजकीय क्रांती होऊ शकते.
वाघ कधीही जंगलात शिकार एकटाच करतो, पण कळपात राहतो. माणसात जसा अहंकार, स्वाभिमान असतो तसाच प्राण्यामध्ये सुद्धा असतो. दोन मित्र गैरसमजा मुळे शत्रु बनतात तसेच प्राण्यात सुद्धा होते. संकट समयी माणुस जसा माणुस म्हणून धाऊन जातो तसाच प्राण्यांच्या संकट समयी प्राणीच धाऊन जातो.

एकदा एक वयस्कर वाघ शिकार करण्यासाठी फिरत असतांना पंचवीस तीस कुत्रे त्याला घेरतात व त्यांच्यावर जोर जोराने भुंकून हल्ला करतात. तो आवाज ऐकून दुसरा वाघ त्या वाघाच्या मदतीला धावून जातो. तो फक्त दाहडतो तर सर्व कुत्रे पळून जातात. वयस्कर वाघ उभा राहतो आणि सावरतो तो पर्यंत मदतीला धावून आलेला वाघ निघून जातो. इतर प्राणी हे सर्व पाहत होते, त्यांनी त्या वाघाला विचारले तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. मग त्यांला वाचविण्यासाठी का गेला? तेव्हा ते वाघाने उत्तर दिले आमची आपसात नाराजी, गैरसमज जरी असले तरी एकूण प्राणी समाजात असा समज जाऊ नये की कुत्रे ही वाघाला मारून टाकतात. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू महोदया, आपण आदिवासी समाजाला काय संदेश देणार आहात?.
देशात ८५ टक्के ओबीसी, मागासवर्गीय बहुजन समाजाच्या रक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळी धाऊन आले.आणि आज ही ओबीसी, मागासवर्गीय,बहुजन समाजाच्या रक्षणासाठी आंबेडकरी विचारांचे लोक परिणामाची पर्वा न करता लिहण्यासाठी, बोलण्यासाठी, लढण्यासाठी पुढाकार घेतात. गुलामला गुलामगिरीची जाणीव करून देतात. म्हणूनच आता सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामानी निराश आणि भयभीत न होता पदाची गरिमा जगाला दाखवून द्यावी.

सागर रामभाऊ तायडे,
भांडुप,मुंबई.
मो. ९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here