Home महाराष्ट्र यवतमाळ येथे भीम टायगर सेनेचे आमरण उपोषणाची यशस्वीरित्या सांगता

यवतमाळ येथे भीम टायगर सेनेचे आमरण उपोषणाची यशस्वीरित्या सांगता

269

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)

उमरखेड (दिनांक १६ ऑगस्ट) उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी भीम टायगर सेना सामाजिक संघटना चे जिल्हा कार्याध्यक्ष शाम धुळे यांना असभ्य भाषेतून बोलल्यामुळे यवतमाळ येथील आजाद मैदान येथे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी संबंधित पोलीस निरीक्षक सोळंके यांची खातीनिहाय चौकशी करणे, पोलीस निरीक्षक यांची तात्काळ बदली करणे, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार इतर गुन्हे दाखल करणे, पोलीस निरीक्षकाचे आणि त्यांचे रायटर यांचे ऑल कॉल रेकॉर्ड तपासणे या मागण्यासाठी सविधान रक्षक दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला बसले होते.

यावेळी हनुमंत गायकवाड (पोलीस उपविभागीय अधिकारी उमरखेड), एलसीबी प्रमुख अधिकारी देवकते आणि उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी उपोषण मंडपाला भेट देत राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्यासोबत फोनवर सविस्तर चर्चा करून उपोषण मागे घेण्यास विनंती केली.

आमचे मार्गदर्शक दादासाहेब शेळके यांनी फोनवर सांगितल्याप्रमाणे सदर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावण भाई शेंडे, करण भरणे उपजिल्हाध्यक्ष, श्याम बनसोड (जिल्हा अध्यक्ष कामगार सेना) सुमेध पेटकर, कैलास कदम (तालुका अध्यक्ष) सिद्धार्थ (शहराध्यक्ष उमरखेड) नागसेन मनवर इत्यादी यवतमाळ जिल्ह्यातील भिम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——–
:- या प्रकरणाची योग्य ती कायदेशीर तजवीज चौकशी करू सदर अमरण उपोषण मागे घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे – हनुमंत गायकवाड (पोलीस उपविभाग अधिकारी उमरखेड)
——-
मला असभ्य भाषेतून ठाण्याचा सोळंकी यांनी बोलल्यामुळे मी आमरण उपोषणाला बसलो होतो पण उपोषण मंडपी गायकवाड साहेब, देवकते साहेब आणि उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोळंके साहेब प्रत्यक्ष भेटीला आल्यामुळे सदर विषयावर सविस्तर चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे मी हे उपोषण कोणत्याही दबावाखाली मागे न घेता नसून स्वाईच्छेने मागे घेत आहों – शाम धुळे (उपोषणकर्ते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here