


कराड – केसे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दातृत्वाच्या भावनेने साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. आदर्शमाता प्रतिष्ठानच्या दातृत्वाच्या भावनेचे इतरांनी अनुकरण करावे असे मत कराड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांनी केले.
आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून आदर्श विद्यार्थी दत्तक संकल्पना राबविण्यात आले असून या संकल्पनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील बहुतांश शाळांच्या इयत्ता चौथीचे पाच विद्यार्थी दत्तक घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचा नुकता शुभारंभ केसे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चव्हाण होते. यावेळी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना जाधव,न्यूज 24 भारतच्या विद्या मोरे, राष्ट्रवादी मालखेड शाखेचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. शीला पाटील, केसाची युवा नेते बाजीराव शिंदे, आदर्शमाता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि संजय गांधी समितीचे कराड तालुका माजी सदस्य पोपटराव कांबळे, पाडळी (केसे) ग्रामपंचायतचे सदस्य आनंदा बडेकर, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक मस्के, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, आदर्शमाता प्रतिष्ठानचे खानापूर तालुका प्रतिनिधी सचिन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप म्हणाले, आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीमध्ये केलेले काम खरंच प्रेरणादायी आहे. विशेषतः प्रतिष्ठानच्या माध्यमातून मानवता धर्म आणि शिक्षणाचे महत्त्व या दोन गोष्टी प्राधान्याने विचारात घेऊन सुरू असलेले कार्य इतरांना आदर्शवत आहे त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी आदर्श माता प्रतिष्ठानच्या आदर्श वरती काम करावे असे आवाहनही शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांनी केले.स्वागत दिपक भिसे यांनी केले तर आभार विद्या मोरे यांनी मानले.














