Home राजकारण फलटण शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

फलटण शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

307

 

फलटण, दि .२७ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा ) यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत फलटण शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून शिवाजी नगर फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते आबा ढोबळे, जनार्दन ढोबळे, लखन बल्लाळ, सचिन बल्लाळ, व महिला कार्यकर्ते यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा ) यांच्या ‌उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला असून राजे गटाचे कार्यकर्ते लक्ष्मण काकडे यांनी समस्त कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत केले तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विचार जनमानसात रूजवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here