Home महाराष्ट्र पळशी,भालवडी येथे भारतीय बौद्ध महासंभेच्या वतीने उपासिका (महिला) शिबीर संपन्न

पळशी,भालवडी येथे भारतीय बौद्ध महासंभेच्या वतीने उपासिका (महिला) शिबीर संपन्न

208

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : भारतीय बौद्ध महासभा माण तालुका शाखेच्या वतीने दहा दिवसीय उपासिका (महिला )धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप 6 फेब्रुवारी 2024 रोजी सारनाथ बुद्ध विहार पळशी व बुद्ध विहार भालवडी येथे संपन्न झाला
29 जानेवारी ते 07 फेब्रुवारी डिसेंबर या कालावधीत सारनाथ बुद्ध विहार पळशी आनी भालवडी येथे आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये ज्योती ताई साळवे आणि दिपाताई कांबळे या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले
या शिबिरामध्ये माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, बुद्ध चरित्र आदी विषयावर आणि अंधश्रद्धा या विषयावर संपूर्ण दहा दिवस मार्गदर्शन केले गेले.
या दोन्ही गावातील शिबिरामध्ये प्रत्येकी 30 (महिला) उपासिकाचा सहभाग होता या समारोपावेळी उपासिकानी या शिबिरामध्ये मिळालेल्या ज्ञानचे आपल्या मनोगतातून सांगितले
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी धम्म बांधवांचे सहकार्य लाभले यांचा मुख्य सांगता समारोप 7फेब्रुवारी रोजी कोरेगाव, जि सातारा येथे होणार असून जिल्ह्यातील आयोजित सर्व उपासिका शिबिरातील उपासिका उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भारतीय बौध्द महासंभा शाखा माण तालुका अध्यक्ष आयु.अरविंद बनसोडे, बौद्धाचार्य आयु. कुमार सरतापे,बौद्धाचार्य पिंटू बनसोडे, आयु. सचिन सरतापे आदी पदाधिकारी आणि धम्म बांधव माता भगिनीं यांची उपस्थिती होती.
या नंतर अध्यक्षीय भाष्णानंतर हा समारोप सोहळा पार पडल्याचे त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here