Home महाराष्ट्र म्हसवड येथील धनगर समाजाच्या उपोषणास माण तालुका दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा.

म्हसवड येथील धनगर समाजाच्या उपोषणास माण तालुका दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा.

159

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड :धनगर समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी माण तालुक्यातील धनगर समाज बांधव म्हसवड नगरपालिकेसमोर मागील ८ दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत. म्हसवड येथील राज्यव्यापी धनगर बांधवांच्या उपोषणास माण तालुका दिव्यांग संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पाठिंबा दिल्या बद्दल धनगर समाजातील बांधवांनी माण तालुका दिव्यांग संघटनेचे आभार मानले.
यावेळी अपंग संघटनेचे माण तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर सर, मार्गदर्शक सुनील माने, उपाध्यक्ष लक्ष्मण हुलगे, सचिव बाळू कोळेकर, कार्याध्यक्ष विकास खिलारी, कायदा सल्लागार ऍड.अनिल सरतापे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर करचे, म्हसवड शहराध्यक्ष प्रशांत ढवण, वाकी शाखाध्यक्ष अरुण तुपे, आदी पदाधिकारी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here