Home महाराष्ट्र सर्व वयोगटासाठी व्यायाम गरजेचा – डॉ. सौ.धनश्री शांताराम गोताड

सर्व वयोगटासाठी व्यायाम गरजेचा – डॉ. सौ.धनश्री शांताराम गोताड

231

 

कराड: आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूलमानाने शारीरिक,मानसिक,सामाजिक, संतुलनाची स्थिती असते. आरोग्यात असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. त्यामुळे आहारात दैनंदिन जीवनात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटकयुक्त सकस व संतुलित पुरेसा आहार आवश्यक आहे.त्यांनी आहारात एच बी वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने गाजर, मोड आलेले कडधान्य, टोमॅटो ,नाचणी यासारख्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. असे प्रतिपादन मा. डॉ. सौ. धनश्री शांताराम गोताड (समुदाय आरोग्य अधिकारी, इरकरे) यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या ज्युनिअर विभागाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” दुसऱ्या दिवशी केले
तसेच त्यांनी मासिक पाळी बद्दल विस्तृतपणे माहिती दिली. विशेष करून व्यायाम या घटकावर त्यांनी भर दिला. मुले,मुली, वृद्ध अशा सर्व वयोगटासाठी व्यायाम गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सौ. आशालता अरुण थोरात ग्रामपंचायत सदस्या होत्या तसेच प्रमुख उपस्थिती नडशी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री.गोविंदराव कृष्णा थोरात होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षांचा परिचय विद्यार्थिनी कु. जानवी हनुमंत रविडढोणे हिने करून दिला तसेच आभार कु. चंदना नंदाजी गोरे हिने मानले व सूत्रसंचालन कु. माधवी विलास खोचरे हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here