Home मनोरंजन इंटरनॅशनल फालम फोक मराठी चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित

इंटरनॅशनल फालम फोक मराठी चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित

233

 

पुणे- मराठी भाषेच्या अस्मितेसाठी व ती टिकवण्यासाठीच्या कथानकावर आधारित विद्यानंद मानकर प्रस्तुत , धीयो फिल्म्स निर्मित व धीरज गुरव दिग्दर्शित इंटरनॅशनल फालम फोक या मराठी चित्रपटाचे चित्रपटातील निर्माते दिग्दर्शक कलाकार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रीमियर शोचे आयोजन पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड येथे करण्यात आले होते. या प्रीमियर शो प्रसंगी चित्रपटाचे निर्माते विद्यानंद माणिकराव मानकर, चित्रपट अभिनेत्री मोनालीसा बागल , चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे, अभिनेते अरबाज शेख, आंतरराष्ट्रीय विजेते दिग्दर्शक शंकर धोत्रे, दिग्दर्शक अनुप जगदाळे, इंटरनॅशनल फालम फोक चित्रपटाचे दिग्दर्शक धीरज गुरव, इंटरनॅशनल फालम फोक मुख्य अभिनेता योगेश खिलारे , इंटरनॅशनल फालम फोक चित्रपटाचे संगीतकार ऋषी बी, फिल्म एडिटर विनोद राजे, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, वनिता वागसकर, डॅा एकनाथ खेडकर, डॅा.कृष्णकांत मानकर, रमेश परदेशी, सुरेश जैन, रणजीत शिरोळे, ॲड गणेश सातपुते, सचिन चिखले, जयराज लांडगे, शशांक पत्की, रूता पत्की, श्याम मारणे, हेमंत डांगे, अनिकेत प्रभू, अंकुश तापकीर, डॉ. सुरेश माळी, डॅा सुरेश शिरबहादूरकर, डॅा संतोष महाजन, रामदास दरेकर, मकरंद पाटे, सीमा बोथरा, सुनिल धनगर, डॅा रमेश राठोड, संजय भोर, ग्रंथमित्र रमेश सुतार, अभिनेते सचिन गवळी आदी शैक्षणिक, सामाजिक राजकीय व चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा टिकावी या उद्देशाने दिग्दर्शक धीरज गुरव यांनी मराठी भाषेचे महत्व कथानकातून या चित्रपटात मांडले आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात चित्रपट निर्मिती विद्यानंद मानकर यांनी केली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा, तानाजी गळगुंडे, अभिनेते अरबाज शेख या कलाकारांनी आपल्या भूमिका वास्तववादी साकारल्या आहेत. चित्रपटात फक्त एक गीत असून चित्रपटाची कथा पटकथा व संवाद ला .रा .साळुंखे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते धीरज गुरव, योगेश खिलारे, ज्योती गुरव,आनंद करडे हे आहेत. चित्रपटाची छायांकन व संकलन राहुल लोखंडे यांनी केले आहे.या चित्रपटाचे वितरण बॉक्सहिट मुव्हीज,अनुप जगदाळे व मोनालिसा बागल यांनी केले आहे.इंटरनॅशनल फालम फोक चित्रपट सर्व महाराष्ट्रात 27 ऑक्टोबर 2023 पासून प्रदर्शित झाला आहे. शिक्षणातील सद्य स्थिती तसेच मराठी भाषेच्या अस्मितेसाठी व ती टिकवण्यासाठी नक्कीच मराठी प्रेक्षकांनी इंटरनॅशनल फालम फोक हा आगळावेगळा चित्रपट बघण्यासाठी नक्कीच जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here