Home महाराष्ट्र प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !… २७ नोव्हेंबरला जिल्हा अधिवेशन...

प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !… २७ नोव्हेंबरला जिल्हा अधिवेशन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होणार !….

182

 

प्रतिनिधी – पी.डी.पाटील

जळगांव – शहरातील माध्यमिक शिक्षकांची पतपेढी येथे ‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे जिल्हा अधिवेशन येत्या २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष मुबारक शहा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोटान शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेशजी काकडे होते. या प्रसंगी प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंदजी भालेराव यांनी संघटनेचे कार्य विशद करून येत्या २७ नोव्हेंबर, २०२३ ला प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हा अधिवेशन अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे होणार असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विभागातील प्रत्येक तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक/ शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिला जाणार आहे असे प्रतिपादन केले.
प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हा महासचिव मिलिंदजी निकम यांनी संघटनेचे जिल्हा अधिवेशन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रोटानचे तिसरे जिल्हा अधिवेशन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पडेल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशजी काकडे यांनी सर्व उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा करून समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रोटान शिक्षक संघटना सर्व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले. प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे यापुढे देखील होत राहील असे प्रतिपादन काकडे यांनी केले.
या बैठकीत जिल्हा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या निर्माण करण्यात आल्या व विविध पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
या जिल्हास्तरीय मिटींगला प्रोटान विभागीय उपाध्यक्ष महेंद्र कुमार तायडे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम माळी, अजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश वाडेकर, प्रसिद्ध प्रमुख प्रा.डाॅ.किरण चव्हाण, सहकोषाध्यक्ष मदनकुमार, सचिव किशोर भामरे, सागर सोनवणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दत्तप्रसाद सुरवाडे, संजय अंदुरकर, महिला प्रतिनिधी प्रभाताई तायडे, तसेच सोपान भवरे, पी.डी.पाटील, राहुल जाधव हे उपस्थित होते. आभार सुनिल मोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here