Home महाराष्ट्र वकृत्व स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेजचे यश

वकृत्व स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेजचे यश

158

 

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील विद्यार्थीनी कुमारी अल्फिया अबुबकर मुल्ला हिने वकृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर येथे हिंदी सप्ताह निमित्त विद्यापीठ स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये “हिंदी का अंतर्राष्ट्रीय महत्व” या विषयावर वकृत्व केले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ सलंग्नित विविध महाविद्यालयातील विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या यशाबद्दल हिंदी दिनाचे औचित्य साधून महाविध्यालयातर्फे डॉ. मच्छिंद्र कुमार, मा. बयाबाई कदम कन्या महाविद्यालय, रहिमतपूर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत सहभागासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ. डी. पी.जाधव, प्रा. पी.पी. कांबले व प्रा. एम. एम. बागवान यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री अरुण पांडुरंग पाटील (काका) आणि संस्थेचे सेक्रेटरी श्री अल्ताफ हुसेन मुल्ला महाविद्याल्यातील प्राध्यापक आणि संस्थेचे प्रशासकीय कर्मचारियानी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here