


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 2 ऑक्टोबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती गावंडे महाविद्यालयात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व पदयात्रा काढण्यात आली.
व स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पने अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
1 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
त्यानिमित्य महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या दिवसानिमित्त भाषणे केली व त्यानुसार त्यांना पारितोषिक देण्यात येईल. विद्यार्थ्यांमधूनच अध्यक्ष पवन गारशेटवाड, प्रमुख पाहुणे प्रीती भोंग, कृष्णा राठोड व सूत्रसंचालन मनीषा जाधव प्रास्ताविक सावली राठोड, आभार प्रदर्शन कू. मयुरी नरवाडे हिने केले.
संपूर्ण कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, पर्यवेक्षक प्रा. बी. यु. लाभसेटवार , प्रा. व्हीं. बी. कनवाळे उपस्थित होते.
अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज,यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक रुंद व प्रशासकीय कर्मचारी यांचे मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. सौ. ए. पी. मिटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम,
प्रो. डॉ. प्रशांत य. अनासाने, प्रा. अर्चना मिटके, प्रा. एस. एस. इंगळे, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन प्रा. एस. एस. पाचकूडके आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व एन.सी. सी.चे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.














