Home महाराष्ट्र कंत्राटी भरतीमुळे तरूणांचं भवितव्य अंधारात, सरकारनं भूमिका स्पष्ट करावी — आमदार देवेंद्र...

कंत्राटी भरतीमुळे तरूणांचं भवितव्य अंधारात, सरकारनं भूमिका स्पष्ट करावी — आमदार देवेंद्र भुयार कंत्राटी पदभरती निर्णय तत्काळ मागे घेण्याची आमदार देवेंद्र भुयार यांची मागणी !

155

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
शासनानं अनेक पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं तरूणांमध्ये रोष निर्माण झालाय. कंत्राटी भरतीमुळे तरूणांचे भवितव्य अंधारात आहे, असा आरोप मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केला असून याबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील तरुण पिढीला शासकीय सेवेत रुजू होताना जर कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू व्हावं लागतं असेल तर हे निंदनीय आहे,तरुण पिढी कित्येक वर्षांपासून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत.असे असताना सरकार जर तरुणांच्या अपेक्षा भंग करीत असेल तर ते खेदजनक आहे, सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरुणांना सरकारी नोकरी पासून मुकावे लागत आहे. सरकारच्या या कृतीचा आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर निषेध केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व तरुणांच्या भविष्याचा विचार करून अन्यायकारक सदर निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा,
अन्यथा अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील बेरोजगार युवक,युवतींना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात एक युवा विधानसभा सदस्य म्हणून आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर ताशेरे ओढत टीका केली आहे. राज्य सरकार आता कायमस्वरूपी रिक्त पदांची भरती न करता, पाच वर्षांसाठी कंत्राटी पद्धत लागू करणार आहे. तरूणांचं भवितव्य यामुळं अंधारात जाणार आहे त्यामुळे शिंदे सरकारने कंत्राटी पद्धतीची भूमिका स्पष्ट करून कंत्राटी पदभरती निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बॉक्स :-
एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही,ही अतिशय गंभीर बाब आहे. हि या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे — आमदार देवेंद्र भुयार

मा.महोदय,
वरील वृत्ताला प्रसिद्धी देऊन उपकृत करावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here