


✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.29ऑगस्ट):-मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री यांची संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना पोळा भेट 1500 रुपये अनुदानात वाढ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्षांनी त्यांचे मानले आभार
तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजना बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री वटकर तहसीलदार साहेब,श्री चिडे नायब तहसीलदार,श्री मनोहर कुळसंगे सदस्य,श्री अमोल आसेकर सदस्य,श्री निखिल भोंगळे सदस्य,सौ लक्ष्मी बाई कुळमिथे सदस्य,श्री सुरेश टेकाम सदस्य, श्री बाबाराव पोहनकर सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,श्री अमोल लोकरे कर विभाग अधिकारी नगर पंचायत कोरपना आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री वटकर तहसीलदार साहेबनी नवनिर्वाचित श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्षाचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व पहिल्याच बैठकीत 218 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री यांनी लाभार्थ्यांना पोळा भेट अनुदानात 1500 रुपये वाढ केल्या बद्दल त्यांचे कौतुक केले व सर्वांनी आभार मानले श्री नारायण हिवरकर यांनी सर्व गरजु,गोर गरीब लाभार्थ्यांनी स्वता पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा आम्ही सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवुण देऊ व सर्वोतोपरी मदत करु असे आवाहन केले बैठकीला मोलाचे सहकार्य श्री ढोबळे बाबु,सौ मालेकर मडम,श्री महादेव कुळमिथे आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले













