


जे रामदास स्वामीचे कट्टरवादी भक्त सांगत राहतात की रामदासाने छत्रपती शिवरायांना मोगलांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्या भक्तांचे यावर काय म्हणणे आहे? कट्टर हिंदुत्ववादी काय बोलतील यावर?हे खालील अष्टके वाचली की रामदासावर जो ‘आदिलशहा चा हेर’ असल्याचा आरोप होतो तो खरा वाटतो. म्हणजे मोगलांकडे गेले की तिकडची हाजी-हाजी करायची आणि इकडे आले की छत्रपतींची. हेच लिखाण जर दुसऱ्या एखाद्या संताने केले असते तर? आता यांचे भक्त ही शिकवण जगाला सांगणार काय?
समर्थ वाग्देवता संशोधन मंडळ, धुळे यांचे जाहीर आभार…🙏🌹🙏 की त्यांनी ही माहिती समीर आणली.
(अष्टकांचा अर्थ जो माझ्या अल्पबुद्धीला समजला तो लावला आहे)
1) दुन्या काहि धंदा सबों छोड देना।
दुन्या दो दिनोंकि दुन्याहि न होना।
अछि है राह पिर पैगोंबरोकि।
कहे रामदासो
अर्थ:- जगातील इतर सगळे कामं(इच्छा-आकांक्षा) सोडून, दोन दिवसांच्या(क्षणभंगुर) जगाची आशा सोडून, जीवनाच्या उद्धारासाठी पैगंबराच्या मार्गाने गेले पाहिजे, तोच मार्ग चांगला आहे..
2) घट घट साहि यारे आज्यब अल्लमियाँ रे
ये हिदु मुसलमान दोन्हो चलावे’
अर्थ:- मनुष्यप्राण्याच्या आत अल्लामियाँ च राहतो, अल्ला च हिंदू आणि मुसलमान दोघांनाही चालवतो (पोसतो)
3) फतर्या फुटे गा खुदा सोज्यु दारे फुढेसा तुटॆसा नहि सो सही रे ल्युभित: पाहाडो किया है खुदाने फतर्पर्थरि नेत हिंदू दिवाने
अर्थ:- फत्तर (दगड) हा फुटू शकतो, म्हणून दगड खुदा होऊ शकत नाही, खुदा हा फुटणारा तुटणारा नसतो. पहाड निर्माण करणाऱ्या खुदाला वेडे हिंदू दगडातच बघतात आणि त्या दगडावरच श्रद्धा ठेवतात.
4) आडबसा महज्यब हिंदू दिवाना
ईनीका कहु सोसमज्बे तु माना
या अल्ला या अल्ला अमजज्सी कहेरे
कहे रामदासो पियारे सहि रे
अर्थ:- हिंदू दिवान्यांचा (वेड्यांचा) धर्म अजब आहे. धर्म काय सांगतो ते समजून घेऊन मग त्याचा अवलंब करा. या अल्ला, या अल्ला जेव्हा म्हणशील त्यावेळी ते परमेश्वराचेच नाव आहे असे समजून म्हण.. हे सत्य प्यारे रामदास सांगत आहेत.
5) अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।
किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।
नहि रंग ना रूप रेखा कछुही।
मुँह से हि कहेसा नूहि वो ईलाहि।।
सभी ज्यातसे वो है रे नियारा।
कहे रामदासो चला वेहि सारा।।
सर्वोज्यात मोहि हहि बस्त यहि ।
ईनो कि कहुं ज्यात से कोण भाई।।
नहि त्यात ना गोतसे सो निराला ।
कहे रामदासो ये आला ये आला।।’
अर्थ- इलाही- अल्लाह हा अनोखा(न्यारा) आहे, त्याच्यासारखा कुणीच नाही, त्याला रामग, रूप, रेखा काहीच नाही. त्याला डोळ्यांनी नव्हे तर ज्ञानचक्षूंनीच बघू शकतो. सर्वच जाती-धर्म, गोत्रात तो वसत असल्यामुळे तो कोणत्या जाती-धर्माचा किंवा गोत्राचा नाही. त्यानेच मला हे सर्व सांगितल्यामुळे हा रामदास त्याचे नाव घेतोय.
6)सबोंमे कहे सो च्यलावे ईलाहि ।
ज्युदाहि नहि रे न कर्बे लडाई।।
नहि बाद बेबाद भाई तमण्ना।
रहिम्काहि बाना सबोंने च्यलाना।।
अर्थ:- जसे बोलणे तसेच वागणे, कधीच वाद-विवाद, भांडण-तंटे करण्याची मानसिकता न ठेवणे, हाच रहीमचा बाणा सर्वांनी चालवला पाहिजे. जे असे वागतात तेच रहीमचे खरे भक्त आहेत.
7)’खुदाकेहि वास्ते फकिरिही लेना।
सबो से भलाई लडाई न कर्ना ।।
भला साधु सो वो हरामि न लेवे।
खुसि हालसेंहि मिला तोहि खावे।’
अर्थ:- खुदा च्या प्राप्तीसाठी फकिरीच घ्यावी, भांडण-तंट्यात न पडता सर्वांशी चांगली वागणूक ठेवावी, आनंदाने मिळेल ते खावं, साधू होऊन देखील जो चुकीच्या गोष्टीत गुंततो त्याला देव समजलाच नाही.
8) ‘पिरोंके पगोंसे हमें ने सुन्हों साथ भाई कहुं येहि माना।
कहे रामदासो अकल्से पछाना।’
अर्थ:- पिरांच्या चरणांपासूनच आम्हाला हे ज्ञान प्राप्त झाल्याचे रामदास सांगतात.
यातच रामदास सांगतात की,
‘पकर्बे राहा पिर पैगोंब्बरो के बडे हो गये है,
न छोडि ईनो कि ईसिमो हि है रे भला फायदाहि
भला हे कहेगा सबोंहि..’
अर्थ:- पिर पैगंबरांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यामुळेच बहुतांचे भले झाले आहे, त्यांनी दाखविलेला मार्ग कधीच सोडू नये त्यातच सर्वांचे भले(फायदा) आहे.
संदर्भ- (1) समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे याठिकाणचे हस्तलिखित बाडं क्र.668, त्यातील रामदासांनी रचलेले मुसलमानी अष्टक, 2)रामदासांची मुसलमानी अष्टके- इंदू लिमये) आणि 3)’मराठे आणि महाराष्ट्र’, अ. रा. कुलकर्णी, डायमंड पब्लिकेशन, पुणे)
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666













