


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.13ऑगस्ट):- येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये
राष्ट्रीय सेवा योजना, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय युवा दिन-12 ऑगस्ट, 2023 निमित्त “महा युवा संवाद एड्स जनजागरण अभियान” राबविण्यात आले. याप्रसंगी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराडचे समुपदेशक मा. श्री महेश शिंदे यांनी एड्स जनजागरण संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. डॉ. तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एड्स जनजागरण अभियान कार्यक्रमाचे थेट प्रसारण प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्याना दाखविण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे अध्यक्षस्थानी होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी केले. प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.














