


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.10ऑगस्ट):- येथील लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी यांच्या वतीने आज दि 10/08/23 रोज गुरुवार जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा, दत्तमंदिर, गंगाखेड येथे विद्यार्थीना पिंक आय पासून संरक्षण होण्यासाठी आय ड्रॉप चे वाटप करण्यात आले तसेच हि शाळा दत्तक सुद्धा घेण्यात आली.
याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष आदरणीय लॉ. श्रीधराचार्य जोशी, सचिव लॉ.भगत सुरवसे कोषाध्यक्ष लॉ मकरंद चिनके उपाध्यक्ष लॉ.अभिनय नळदकर लॉ.विष्णु मुरकुटे, क्लब टेमर लॉ.नागेश केरकर संचालक लॉ.बाळासाहेब मुंडे, लॉ महेंंद्र वरवडे, लॉ महेन्द्र कांबळे, लॉ अभिजित चौधरी लॉ उमेश पापडु तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.














