Home महाराष्ट्र धम्म चळवळच संविधान चळवळ यशस्वी करू शकते

धम्म चळवळच संविधान चळवळ यशस्वी करू शकते

190

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30जुलै):- माण तालुका बौद्ध बांधवांची दुसरी मासिक बैठक पळशी, ता. माण येथे ठरल्याप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी सुरवातीला महा मानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेच्या वाचनाने बैठकीची सुरुवात झाली. भोसले सर यांनी सर्वाचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी विवीध स्पर्धा परीक्षा देवून यशस्वी विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

त्यानंतर मागील सभेचे विषय वाचून त्यावर चर्चा झाली.नंतर धम्म आणि भारतीय संविधान जगृतीबाबत कार्य करण्याबाबतनिर्णय झाले.पुढील दिशा निश्चित करुन सभा संपन्न झाली.यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन संविधाणाचा जागर झालाच पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना संविधान हे समजले पाहिजे यासाठी संविधान समिती स्थापण केली त्या समितीने आणि बहुजन बांधवानी संविधान तालुक्यात सर्व भागात त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे या बैठकीत ठरविले.

तालुक्यातील सर्व भागातून मोठ्या संख्येने बांधव, तरुण उपस्थित होते. पळशी येथील कार्यकर्त्यानी सर्वांसाठी छान जेवण दिले व सर्व व्यवस्था चोख आणि व्यवस्थित पाहीली.सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here