Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजन योजनेतील आहार वाटप प्रकरणात गैरप्रकार!

विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजन योजनेतील आहार वाटप प्रकरणात गैरप्रकार!

191

🔸कागदावरील सकस आहार प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत जातच नाही

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 26जुलै):-विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून वर्ग एक ते आठ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान भोजन योजनेअंतर्गत सकस आहार दिल्या जातो परंतु विद्यार्थ्यांच्या नावावर दिल्या जाणाऱ्या या आहार योजनेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार तर होत नाही ना ? असा सवाल आता उपस्थित केल्या जात असून या योजनेतून विद्यार्थ्यांना कागदोपत्री देण्यात येणारा आहार व प्रत्यक्षात देण्यात येणाऱ्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मध्यान भोजन योजने अंतर्गत वर्ग एक ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारातून वर्ग एक ते पाच या विद्यार्थ्यांना दररोज 100 ग्रॅम व वर्ग सहा ते आठ या वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज 150 ग्रॅम खिचडी व भात, आमटी आठवड्यातील काही दिवस स्थानिक उपलब्धते नुसार मिळणारी फळे व तसेच खारीक खजूर, राजगिरा किंवा शेंगदाणा चिक्की व इतर यापैकी कुठलेही एक सकस खाद्य देण्याचे या योजनेत नमूद करण्यात आले आहे.

परंतु प्रत्यक्षात मात्र उमरखेड तालुक्यातील बहुतांश शाळात अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आहार दिल्यात जात नाही.

याबाबत उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ता सैय्यद परवेज ईसा रा. तातरशहा वार्ड , यांनी उमरखेड शहरातील न.पा.डॉ. इकबाल उर्दू प्राथमिक शाळेत चालविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना दररोज कोणकोणत्या प्रकारचा आहार दिला जातो या संबंधातील माहिती अधिकारातून माहिती विचारण्यात आली होती.

परंतु गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी याबाबतीत ओळखू न येण्यासारखी अर्धवट माहिती पुरविली त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याचा याबाबतीत संशय वाढला असून खरेच विद्यार्थ्यांना कागदावर देण्यात येणारा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पोटासाठी दिल्या जातो काय? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित केल्या जात असून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मध्यान भोजन योजनेत कागदावर दर्शविल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आहार दिल्या जात नसल्याचे स्पष्ट होत असून या मध्यान भोजन योजनेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत तर नाही ना या बाबीची संबंधित विभागाने सखोल चौकशी करून कागदावर दर्शविण्यात आल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पोटात आहार जातो काय या बाबीची खातरजमा करून घेण्याची मागणी पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here