Home महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालंय व ज्यु. कॉलेज देवापूर सहविचार सभा संम्पन्न

कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालंय व ज्यु. कॉलेज देवापूर सहविचार सभा संम्पन्न

204

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22जुलै):-देवापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स देवापूर येथे इयत्ता अकरावी सी.ई.टी प्रकल्प उद्घाटन व पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य एन. डी नदाफ , सुरज ढोले , श्री सरतापे , पत्रकार विशाल माने , धनंजय पानसांडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे प्राध्यापक किरण बाबर व विध्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बी . एन पाटील यांनी केले तर शिक्षक मनोगतामध्ये प्राध्यापक टी. एस माने यांनी सि.ई.टी करिअर विषयी महत्व विशद केले तर पत्रकार विशाल माने यांनी पालक मेळाव्याचे महत्त्व , विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये शिक्षक व पालकांची जागरूकता , मोबाईल एक समस्या , पालकांची पाल्याबद्दलची अतिविश्वासाहर्ता याविषयी मनोगतातून आपले विचार मांडले.तर सी ई टी विभागप्रमुख एस ए सोळसकर यांनी सी ई टी प्रकल्पाची पार्श्वभूमी व महत्व व प्रकल्पाची मांडणी यावर उपस्थितांशी संवाद साधला. व विद्यार्थ्यांच्या दुप्पट मेहनत घेण्यास आम्हीं प्राध्यापक वर्ग तयार असून विद्यार्थ्यांनीही नियोजनपूर्वक अभ्यासाला महत्व दिल्यास निश्चित ध्येयापर्यंत पोचता येईल असे त्यानी सांगितले. यावेळी विध्यार्थी यश धनंजय पानसांडे, कादंबरी ढोले यांनी मनोगत व्यकत केलें.

जुनिअर कॉलेजचे प्राचार्य एन. डी नदाफ यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये उपस्थित विद्यार्थी व पालकांना सीईटी प्रकल्प विद्यार्थी शिस्त यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही चंदुरे यांनी केले तर आभार एस बी बरचे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here