


🔹प्रा बाळासाहेब हिरे प्रथम तर लक्ष्मण माळी द्वितीय
✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहमदनगर(दि.13जुलै):-“शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेमध्ये ५३ नवोदित कवींनी सहभाग नोंदवला होता,यामध्ये ‘बळीराजा जीर्ण’ प्रा.बाळासाहेब हिरे,येवले प्रथम, ‘माणसे शिकली पण’ श्री.लक्ष्मण माळी,उ.सोलापूर द्वितीय तर ‘ स्श्री ‘सौ.उषा शेटिया,केडगाव देवी यांना पारितोषीक जाहिर करण्यात येतं आहेत.” अशी माहिती काव्यलेखन स्पर्धा प्रमुख स्वाती ठुबे यांनी दिली.
पारितोषिक प्राप्त साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तकं व साहित्य संमेलनात सहभाग मिळणार असून उत्तेजनार्थ पारितोषिके ‘नवी पहाट’ संजय आहेर, ‘किंमत’,दर्शन जोशी,संगमनेर, ‘झाड’ सचिन माळी,पाथर्डी यांना देण्यात येणार आहेत.पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
शब्दगंध च्या राज्य संघटक कवयित्री शर्मिला गोसावी,राजेंद्र फंड,कवी सुभाष सोनवणे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. पारितोषीक प्राप्त साहित्यिकांचे संस्थापक सुनील गोसावी,शाहिर भारत गाडेकर,भगवान राऊत,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,अजयकुमार पवार,किशोर डोंगरे यांनी विशेष अभिनंदन













