Home महाराष्ट्र प्रा सुभाष ढगे यांना विशेष ग्रंथ पुरस्कार जाहीर ” ‘लढवय्या’ या पुस्तकास...

प्रा सुभाष ढगे यांना विशेष ग्रंथ पुरस्कार जाहीर ” ‘लढवय्या’ या पुस्तकास दमसाचा पुरस्कार : २५ मे रोजी कोल्हापूर येथे सोहळा “

156

इसलामपूर दि (प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
वाळवा तालुक्यातील ढगेवाडी गावचे सुपुत्र व जेष्ठ् साहित्यिक प्रा सुभाष आनंदा ढगे पाटील यांच्या ‘लढवय्या’ या ग्रंथास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे देण्यात येणारा सन २०२२ मधील विशेष ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘लढवय्या’ ही थोर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी आहे.
नागनाथ अण्णांनी केलेल्या सत्यशोधक समाजाचा, स्वातंत्र्याच्या चळवळीचा,प्रति सरकारचा,संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा,शेतकऱ्यांच्या साठी, न्यायाचा,दुष्काळग्रस्तांच्या,लढ्याचा एक धगधगता इतिहास प्रा सुभाष ढगे पाटील यांनी पुस्तकांमध्ये ओघवत्या भाषेत मांडला आहे.हा ग्रंथ जवळपास पाचशे पानाचा आहे.
प्रा सुभाष ढगे हे वाळवा तालुक्यातील ढगेवाडी सारख्या ग्रामीण भागात जन्मले असून त्यानी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक ते प्राचार्य रयतसेवक म्हणून आदर्श काम केले आहे. सुभाष ढगे पाटील यांना लिखाणाची आवड असून ते ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व कथाकथनकार म्हणून ही परिचित आहेत.
ढगे सर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातले अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांची आजपर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.’लढवय्या’ या पुस्तकास प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर आ ह साळुंखे यांची प्रस्तावना आहे.तर मल पृष्ठावरील शिफारस शिवाजी विद्यापीठाचे प्रा डॉ. रणधीर शिंदे यांची आहे.या पुस्तकाचे प्रकाशन अनिल महमाने निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी केले आहे.
पुरस्काराचे वितरण गुरुवार २५ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here