Home महाराष्ट्र शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते धनादेश वाटप !...

शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते धनादेश वाटप ! कवठकर कुटुंबाला मिळाली ३ लाख ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई !

131

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
वरूड तालुक्यातील टेंभूरखेडा येथील शेतकऱ्यांच्या मौजा भेमडी शिवारात मागील वर्षी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, संत्रा जळून खाक झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली होती.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभूरखेडा येथील शेतकऱ्यांचे मौजा भेमडी शेतशिवरातील रमेश रघुनाथ कवठकर व मनोज गोपाळराव कवठकर या शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे या आगीत शेतातील गहू आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मनोज गोपाळराव कवठकर यांना २ लाख १८ हजार ८९३ रुपये, व रमेश रघुनाथराव कवठकर यांना ८६ हजार १५५ रुपयांचा धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here