


किशोर बावणे, साकोली तालुका प्रतिनिधी मो. 73507 93187
साकोली -येथे शिवाजी वार्ड प्रभाग ०८ मधील अमराई या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषदेला महिलांनी निवेदन दिले. परंतु नगरपरिषद प्रशासन त्यांच्या निवेदनाची काहीच ही दखल न घेता त्यांना ८ दिवसाची वेळ दिली तरीही नगरपरिषदेने आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही. या संतापजनक स्थितीत फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांना काही तेथील जागरूक महिलांनी फोन करुन त्यांना आपली समस्या सांगितली. प्रभागातील सर्व महिलांनी सांगितले की बोअरवेलमध्ये पाणी खराब येते त्याच्या परिणाम मुलाबाळांवर होत असून आरोग्यास धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना फार दूर जाव लागत आहे. आज प्रभागात काहीच सोय नाही. महिलांनी या शब्दात बोलले की “आम्ही साकोली मध्ये राहतो की साकोली बाहेर राहतो, आम्ही नगरपरिषदचा सर्वं कर भरतो तरी आमच्या प्रभागात काहीच सोय नाही” बरोबर रस्ता नाही. शंभर ते दीडशे लोकवस्ती मध्ये फक्त दोन बोरवेल आहेत. त्यांना पण पाणी बरोबर येत नाही. उन्हाळा मध्ये महिलांना पाण्याची खुपच अडचण भासते. जे धनाढ्य लोक आहे त्यांना काहीच अडचण नाही. पण आम्ही गरीब लोक कुठे जाऊ.? त्यावर काही तोडगा काढून आमची समस्या दूर करावी. नाहीतर आम्ही सर्वं महिला नगरपरिषद वर घागर मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे.













