Home महाराष्ट्र फलटण येथे आंबेडकरी प्रजा परिषद उत्साहात संपन्न

फलटण येथे आंबेडकरी प्रजा परिषद उत्साहात संपन्न

162

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी फलटण येथे ८४ वर्षांपूर्वी २३ एप्रिल १९३९ रोजी “ अस्पृश्य प्रजा परिषद घेतली होती.

या दिनानिमित्त सन २०१० पासून “ आंबेडकरी प्रजा परिषदेचे आयोजन फलटण येथे केले जाते. यामध्ये स्थानिक व राज्यातील विविध भागात सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक, आणि धम्म कार्य करणाऱ्या १४ व्यक्ती व संस्थांना “ भिमस्फूर्ती पुरस्काराने गौरविण्यात “ येते.

सन २०२३ च्या भीमस्फूर्ती पुरस्काराने उमेश कांबळे , डाॅ. स्वाती शामराव काळे ( दहिवडी), विजय भंडारे. ( पाटण) ॲड. बापूसाहेब शिलवंत ( विशेष सरकारी वकील), भोलेनाथ भोईटे. ( अध्यक्ष रोहिदास समाज), जयवंत सिताराम काकडे ( से.नि. वाॅरंट आफिसर) , दिगंबर राजाराम अहिवळे ( से. नि. मुख्याध्यापक), सागर चंद्रकात अहिवळे ( उद्योजक), विठ्ठलराव मारूती काकडे ( से. नि. न्यायाधिश), चंद्रकांत जगताप ( उद्योजक) चाॅंदतारा मश्चिद ट्रस्ट ( शुक्रवार पेठ), बुद्ध जयंती समिती,(सन २०२२) फलटण व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती. फलटण यांना देण्यात आला. जेष्ट बांधवांच्या हस्ते सर्व पुरस्कार वितरीत करण्यात आले.

यावेळी प्रबुद्ध विद्याभवन च्या विद्यार्थ्यांचा भीमगीतांवर आधारीत आंबेडकरी सासृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
या परिंषदेची संकल्पना नियोजन व व्यवस्था १३ वर्षापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन व डाॅ. बाबसाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने आणि आंबेडकरी बांधवांच्या सहकार्याने केले जाते.

संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले तर संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्रा. वर्धमान अहिवळे, पुरस्कार प्रमाणपत्रांचे वाचन कुणाल काकडे, अक्षय कांबळे, संदीप अहिवळे, हेमंत कांबळे, सचीन अहिवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचीव मिलिंद अहिवळे यांनी मानले.
परिषदेसाठी मोठ्या संखेने बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here