Home महाराष्ट्र अर्हेरनवरगाव येथे रामजन्मोत्सवासाठी रामभक्तांची उसळली गर्दी

अर्हेरनवरगाव येथे रामजन्मोत्सवासाठी रामभक्तांची उसळली गर्दी

143

🔹यंदा रामनवमीचा उत्साह वाढला

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 1एप्रिल):-तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे शेकडो वर्षापासून चालत आलेल्या रामजन्मोत्सव परंपरेचा वारसा जपण्यासाठी पंचक्रोशीत नाव गाजलेल्या अ-हेरनवरगाव येथिल श्रीराम नवमीची ख्याती टिकवून ठेवण्यासाठी येथील बाजार चौकात श्रीराम जन्मोत्सवाची यात्रा भरविण्यात आली.गावातील आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्याकरीता रात्रोला भजन,कीर्तन आणि स्वरमाला म्युझिकल जागरण व डान्स ग्रुप राजनांदगाव यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .

श्रीराम जन्मोत्सव उत्सवात तलाव देवस्थान , श्रीराम मंदिर , सेवा समिती , श्रीकृष्ण मंडळ आणि श्रीरामचंद्र मंडळ यांनी मागील नऊ दिवसापासून म्हणजे गुडीपडव्याच्या दिवशीपासून आपापल्या मंडळाच्या वतीने दररोज रात्री 9 च्या दरम्यान गावभर भजन दिंडी काढत होते.रामनवमी च्या दिवशी आपआपल्या वार्डातील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिकृतीच्या रथांची रात्रभर मिरवणूक करत रात्री नियोजित जावेवर पोहचल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पुन्हा सकाळी 8 वाजता प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मिरवणूक काढत भजन दिंडीच्या तालावर वार्डात नेण्यात आल्यानंतर वार्डात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला.

जन्मोत्सवा दरम्यान मुख्य चौकात दरवर्षीप्रमाणे आनंद मेल्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे रामजन्मोत्सवाला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अर्हेरनावरगाव येथील रामनवमी परिसरात शेकडो वर्षांपासून प्रासिद्ध आहे. तालुक्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा हजारो नागरिक मिरवणुकीत सहभागी होत असतात.भक्त भाविकांना दर्शन घेण्यासाठी सकाळी 4 ते 8 असा चार तसाचा कालावधी देण्यात येत होता तर काही भक्तमंडळी मिरवणुकीदरम्यान घरूनच दर्शन घेत असत. राम नवमी संपताच हनुमान जयंती पासून सात दिवस श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजण करण्यात आले आहे.शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या रामनवमी उत्सव परंपरा कोरोना काळात दोन वर्षे कोरोनाच्या प्रदूर्भावणे खंडित झाली होती.गतवर्षी रामनवमी उत्साहाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही मात्र यंदा रामनवमी उत्सव दिमाखात भरण्याजोगा होता.

रामजन्मोत्सव दरम्यान गुडीपडव्यापासून रोज सतत नऊ दिवस सायंकाळी भजन दिंडीचे आयोजन केले जाते यात शेकळो भक्तमंडळी सहभागी होत असतात .जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान रामचंद्राची पूजा करून गावभर मिरवणूक काढली जाते.त्यात गावातील तसेच परिसरातील हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी होत असतात. रामनवमी परंपरेला दोन वर्षे खंड पडला असल्याने कोरोना महामारीने परिसरातील भक्त भाविकांवर विरजण पडल्याचे दिसते मात्र यंदा रामजन्मोत्सव दिमाखात भरणारा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here