


✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.19मार्च):- तालुक्यातील भाट अंतरवाली येथील ट्रान्सफॉर्मरमधून वीज पुरवठा करणाऱ्या कोमलवाडी गावाला व गावालगत असलेल्या आडे वस्तीवरील सिंगल फेज व थ्री फेज वीज पुरवठा मागील चार दिवसापूर्वी खंडीत केला होता. चार दिवसांपासून वीज नसल्याने आडे वस्ती, भोसले वस्ती, धनवडे वस्ती, राठोड वस्ती येथील नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत होते.
विजेअभावी येथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. शेतकऱ्यांनी लाईनमन चौधरी यांना संपर्क केला असता बील थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आले आहे असे सांगितले. शेतकऱ्यांनी वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती परंतु वीज पुरवठा होणार नाही असे सांगितले होते.
त्यानंतर याबाबत पत्रकार नवनाथ आडे यांनी करूणा धनंजय मुंडे यांना काॅल करून कल्पना देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर करूणा धनंजय मुंडे यांनी ताबडतोब लाईनमनपासून ते अभियंता पर्यंत संपर्क करून आडे वस्तीवरील सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यास सांगितले. त्यानंतर शनिवार (दि,१८ मार्च) रोजी सायंकाळी ७ वाजता वीज पुरवठा खंडित केलेला सुरळीत चालू केला. यामुळे तेथील नागरिकांनी करूणा धनंजय मुंडे यांचे आभार मानले













