Home महाराष्ट्र गव्हाणे,धोंडगे पाठोपाठ छावाचे प्रदेशाध्यक्ष मोरे सुद्धा बी. आर. एस. च्या मार्गावर…? After...

गव्हाणे,धोंडगे पाठोपाठ छावाचे प्रदेशाध्यक्ष मोरे सुद्धा बी. आर. एस. च्या मार्गावर…? After Gavane, Dhondge, the regional president of the camp, More also B. R. S. On the way to…?

320

✒️नायगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नायगाव(दि.18मार्च):- नायगाव विधानसभा मतदारसंघात विद्यार्थी व युवा नेता म्हणून प्रसिद्ध असलेले छावा युवा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे हे नव्यानेच स्थापन झालेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा जोमाने चालू आहे.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या व सबंध देशाच्या राजकारणात उडी मारत असताना भारत राष्ट्र समिती या पक्षाची स्थापना केली. के. सी. आर. राव (Telangana State Chief Minister K. Chandrasekhar Rao ) हे मागील दहा वर्षापासून तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची ध्येय-धोरणे शेतकऱ्या विषयीची काळजी, बेरोजगार युवकांची काळजी, त्यांनी चालू केलेल्या नवनवीन योजना, यासोबतच शेतीसाठी पूरक असे वेगवेगळे प्रकल्प असतील. या सर्व प्रकल्पांची माहिती घेत असताना त्यांची भविष्याची धोरणे अचूक आहेत असे वाटते.

दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानात या नवीन पक्षाची पहिली सभा झाली. यावेळी अनेकांनी पक्षप्रवेश केला त्यात संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष संतोष पाटील गव्हाणे(Santosh Patil Gavane, Regional President of Farmers’ Alliance of Sambhaji Brigade) यांनी सुद्धा पक्ष प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे (Former MLA and farmer leader Shankar Anna Dhondge) सुद्धा बी आर एस मध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. अशी चर्चा चालू असतानाच त्यांची तारीख सुद्धा ठरली. तेलंगणातून नांदेड मार्गे महाराष्ट्राच्या राजकारणात उसळी मारण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या नावाची अगदी कमी वयात छाप उमटवणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे (State President of Chava Association Rajesh More) हे सुद्धा बी.आर.एस. या पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा जोमाने चालू आहे.याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला असता, मुख्यमंत्री के.सी.आर.राव यांची भेट घेऊन पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

राजेश मोरे हे अगदी कमी वयात सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले असून त्यांनी मतदारसंघात तरुणाईची चांगली मोठी फळी निर्माण केलेली आहे. यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने सुद्धा प्रसिद्ध आहेत. यासोबतच मुख्यमंत्री के सी आर राव यांच्याशी घनिष्ट संबंध असलेले बाबाराव पाटील कदम (Babarao Patil Kadam, who is closely related to Chief Minister KCR Rao) यांचे छोटे पुत्र धनराज कदम यांच्यासोबत त्यांचे अगदी जीवाभावाचे संबंध आहेत. आणि सामान्य जनतेच हित हेच समाजकारण व राजकारण हे ब्रीद वाक्य जोपासणारे राजेश पाटील मोरे हे भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करतील यात तिळमात्र शंका नाही. अशी चर्चा चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here