Home महाराष्ट्र फळा आणि राणीसावरगाव तीर्थक्षेत्रासाठी ६ कोटी मंजूर

फळा आणि राणीसावरगाव तीर्थक्षेत्रासाठी ६ कोटी मंजूर

247

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15मार्च):-तालुक्यातील राणीसावरगाव येथील रेणुका माता मंदिर आणि पालम मधील फळा येथील संत मोतीराम महाराज संस्थान या दोन्ही ठिकाणी पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

त्यानुसार रेणूका माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी आणि संत मोतीराम महाराज संस्थान येथे सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक, कमान बांधकाम व सुशोभिकरण करणे यासाठी १ कोटी असे एकूण ६ कोटी रुपये जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्याचे आदेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहेत.

तसे पत्र आ.डॉ.गुट्टे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
दरम्यान, दोन्ही तीर्थक्षेत्रे जिल्हाभर प्रसिद्ध असल्याने भक्ताची नेहमी गर्दी असते. त्यामुळे पायाभुत सुविधा उपलब्ध झाल्यास तीर्थक्षेत्रांच्या विकासात हातभार लागेल. तसेच भक्तांना येणे-जाणे सोईचे होईल. मतदार संघातील इतरही तीर्थक्षेत्रांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here