


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०
चिमुर(दि.१५ मार्च):-चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदावर चिमुर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे युवा नेते दिवाकर निकुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या मान्यतेने व अखिल भारतीय काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदावर दिवाकर निकुरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली होती.
दिवाकर निकुरे हे गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री तथा ब्रम्हपूरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात चिमुर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे काम करीत आहेत. अल्प कालावधीमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख त्यांच्या सामाजिक उपक्रमाने निर्माण झाली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेवुन ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.













