


🔹छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.14मार्च):-या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता व छत्रपती शिवाजी महारांजानी स्वराज्य निर्माण केले,त्यांच्या काळात बहुजनांना न्याय मिळत होता. परंतु हल्ली भाजपाच्या सरकार मध्ये न्यायात विसंगती दिसत आहे. कॉग्रेस ने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर ज्या अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या. त्या लोकशाहीमूळे झाल्या मात्र या सोयी सुविधा देणाऱ्या संस्था विकण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार श्रीमंताचे घर भरत सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सुरु आहे.
महागाई, बेरोजगारी वाढली यावर स्थानीक लोकप्रतिनीधी बोलत नाही. चिमूर विधान सभा क्षेत्रात अनेक प्रकल्प रखडलेले आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही, पूढची पिढी ही जिवन कसे जगणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. उलट ठेकेदारी करत हुकमशाही सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एक मताच्या अधिकाराचा वापर लोकशाही टिकविण्यासाठी भविष्यात करावा.असे प्रतिपादन डॉ सतिश वारजूकर यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्धघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
शिव-स्वराज्य सेना वहानगाव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव सेनाचे प्रा. दादा दहीकर, कार्यक्रमाचे उद्धघाटक डॉ सतिश वारजूकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक चिमूर विधान सभा काँग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे, सरपंच प्रशांत कोल्हे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, काँग्रेसचे राजू लोनारे, मनसेचे बंडू गेडाम, नितीन लोनारे, समीर बल्की, सुधाकर निवटे, पुंडलीक चोखे, युवराज भोयर, प्रफुल डरे, सदानंद बगडे, श्याम बागडे आदी उपस्थीत होते.तिन दिवसीय कार्यक्रमादरम्यान नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा ,घेण्यात आल्या. दरम्यान रात्रोला शिव शाहीर रामानंद उगले यांचा शिव प्रबोधनात्मक पोवाडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थीत होते.













