


✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.9मार्च);- श्री संत तुकामाई येहळेगाव यांच्या रंग पंचमी व जन्मउत्सवानिमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन मांडवा ते तुकामाई संस्थान येहळेगाव दि.१०मार्च ते १२ मार्च पर्यंत समस्त मांडवावाश्यांकडुन करण्यात आले आहे.
या पायी दिंडीचे प्रस्थान दि. १०मार्चला सकाळी ठिक ८ वा अँड सौ. मोहिणीताई इंद्रनिलभाऊ नाईक यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थित श्री समर्थ नागोजी महाराज संस्थान येथे आरती होईल आणि पायी दिंडी सोहळाला सुरुवात होईल.
या पायी दिंडीला सकाळी ८:३० सांडवा येथे अल्पोपहार व चहा पाणी विनायक पांडे यांचे कडुन होईल. त्यानंतर ११ वा भोजनाची व्यवस्था सावरगाव (बं)येथील देवराव काष्टे यांचे कडुन होईल. त्यानंतर दुपारी विसाव्याकरीता १वा आमदरी येथील दिगाबर देशमुख यांचे कडुन थंड पेय असेल ४ वा शेबाळपिपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंना मानवंदना व पोवाडा होईल. त्यानंतर शेबाळपिपरी विठ्ठल मंदिरात अल्पोपहार व चहा पाणी नंदु डाखोरे यांचे कडुन होईल. सुधाकर तुकाराम पुलाते याचे राहते घरी श्रींचा पालखीचे पुजन होईल व त्याचा शेतात पालखीचा मुक्काम राहिल मुक्कामाचा ५वा. ते ६ वाजेपर्यंत माऊलीचा हरिपाठ त्यानंतर भोजन राहिल अन्नदाते सुधाकर तुकाराम पुलाते याचे कडुन होईल.
नंतर ८ते १०:३०वाजेपर्यंत ह. भ .प .अजय महाराज महाजन दादा अनसिंगकर याचे कीर्तन होईल . श्री समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ व शेबाळपिपरी येथील भजनी मंडळ राहतील. त्यानंतर हरिजागर होईल. दि .११मार्चला सकाळी काकड आरती व पालखी मार्गस्थ होईल. गौळ येथे अल्पोपहार व चहा पाणी धनश्री हॉटेल यांच्या कडून होईल. व सकाळचे भोजन बाभळी येथील बालाजी सूर्यवंशी व नागोजी महाराज संस्थान मांडवा याचे कडुन होईल.विसावा झाला नंतर ४वा तुकामाई संस्थान येळेगाव येथे पालखी मुक्काम त्यानंतर श्रींचे दर्शन होईल व सायंकाळी माऊलीचा हरिपाठ व त्यानंतर भोजन व रात्री हरिजागर होईल.दि.१२मार्चला सकाळी काकड आरती तुकामाई जन्म उत्सव साजरा होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.दुपारी पालखी मांडवा गावाकडे मार्गस्थ होईल.













